रोहयाचे ग्रामदैवत श्री धाविर महाराज देवघटी बसले!

कोरोना नियमांचे पालन करीत महाराजांच्या नवरात्रोत्सवास सुरुवात..

कोलाड (श्याम लोखंडे)   देशात ज्या दोन देवस्थानांना पोलिस मानवंदना देण्याची प्रथा, परंपरा ब्रिटीश काळापासुन सुरू आहे त्यापैकी एक असलेले रायगड वासियांचे श्रध्दास्थान आणि रोहयाचे ग्रामदैवत श्री धाविर महाराज गुरूवारी मंगलमय वातावरणात विधिवत देवघटी बसले. कोरोना नियमांचे पालन करीत अतिशय कमी भक्तगणांच्या उपस्थितीत महाराजांच्या नवरात्रोत्सवास सुरुवात झाली. 

        रोहा शहराच्या पश्चिम बाजुला हनुमान तेकडीच्या पायथ्याशी असलेल्या या सुंदर आणि भव्य मंदिरामध्ये गाभाऱ्यात श्री धाविर महाराज, कालिका माता, बहिरीबुवा वाघबाप्पा मागे तीन वीरा यांचे स्थान आहे. व मंदिराबाहेर महाराजांचा अंगरक्षक चेडा देवाचे स्थान आहे. 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त होत असल्याने यंदाही गतवर्षीप्रमाणे अतिशय साध्या पद्धतीने महाराजांचा नवरात्रोत्सव साजरा होत आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांची पाळनुक करीत सर्व नियोजन करण्यात आले आहे. हा उत्सव रोहा गावाचा एक कौटुंबिक धार्मिक सोहळा असल्याने रोहेकरांनी काळजीपूर्वक दिलेल्या सूचनांचे पालन करीत मंदिरात अधिक गर्दी होणार नाही याची काळजी घेतली, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उत्सवास विधीवत प्रारंभ झाले.

  " हे धाविर महाराजा समस्त रोहावासिय ग्रामस्थांनी श्रध्देने आणी पारंपारीक पध्दतीने तुझा नवरात्रोत्सव मांडला आहे", "या उत्सवामध्ये आमच्या हातुन चांगली सेवा होर्इल.. काही चुका सुध्दा होतील पण महाराजा हा उत्सव गोड मानून घे" तुझ्या गावाला संकटापासून दूर ठेव असे देवस्थानचे पुजारी वालेकर यांनी श्री धाविर देवस्थानचे काही विश्वस्थ आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देवाकडे गारहाणे मांडले आणी अक्षतांची उधळण देवावर होत ग्रामदैवत श्री धाविर महाराजांच्या उत्सवास प्रारंभ झाला. 

        यावेळी मंदिरात विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, कार्यवाह मकरंद बारटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष शैलेश कोळी, सरचिटणीस भुषण भादेकर, माजी नगराध्यक्ष लालताप्रसाद कुशवाह, समीर शेडगे, विश्वस्त नितिन परब, विजयराव मोरे, आप्पा देशमुख, सुभाष राजे, समीर सकपाळ, प्रकाश पवार, महेश सरदार, संदीप सरफळे, जितेंद्र पडवळ, श्रीनिवास वडके, अमित उकडे, राजेश काफरे, निलेश शिर्के, सूर्यकांत कोलाटकर, रवींद्र चाळके, प्रशांत देशमुख आदींसह उत्सव समितीचे पदाधिकारी आणि प्रमुख मान्यवर उपस्थित होते. माजी आमदार अनिल तटकरे यांनी मंदिरात उपस्थिती लावून महाराजांचे दर्शन घेतले.

     मंदिर झाले भक्तांसाठी खुले 

     कोरोनाचे दुसऱ्या लाटेच्या शेवटच्या टप्प्यात मंदिर यंदा खुले करण्यात आले असून कोरोना नियमांचे पालन करीत श्री धाविर महाराजांचा नवरात्रोत्सव विधिवत व भक्तिमय वातावरणामध्ये साजरा होणार आहे. दर रात्रीला शहरातील प्रत्येक आळीला प्रहर जागवीण्याचा बहूमान असतो. 

    पालकमंत्र्यांनी बोलावली बैठक 

       अपुर्व अशा उत्साहामध्ये सुरू झालेल्या या उत्सवाची सांगता दसाऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रायगड पोलिसांच्या मानवंदने नंतर निघणाऱ्यां महाराजांच्या पालखी सोहळयाने संपन्न होत असते. यंदा पालखी उत्सवाच्या नियोजनाबाबत पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आज गुरुवारी सायंकाळी रोह्यात देवस्थानाची प्रमुख मंडळी यांची जिल्हाधिकारी रायगड व जिल्हा पोलिस अधीक्षक रायगड यांची संयुक्त बैठक बोलावली आहे.                                  आकर्षक सजावट आणि रांगोळी

उत्सव होत अदिराचा परिसर विविध रंगी फुलांच्या सजावटीने सजविण्यात आले आहे.. सुंदर रांगोळयांनी वातावरण प्रसन्न झाले असून मंदिरात प्रवेश द्वार, रांगोळी व फुलांची आरास आकर्षक अशी करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog