मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर धुळीला पर्याय पाणी फवारणी, हजारो लिटर पाणी वाया, नागरिकांनसह प्रवाशांच्या जिवाचा मांडला खेळ

         गोवे-कोलाड (विश्वास निकम)                   मुंबई- गोवा या राष्ट्रीय महामार्ग १७ वरील कोलाड,खांब,सुकेली,वाकण या मार्गावर मोठया प्रमाणावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असुन या धुळीला पर्याय म्हणून वाकण नाक्यावर रस्त्याला ट्रॅकरने पाणी मारला जात असुन हजारो लिटर पाणी वाया घालवला जात आहे. पावसाने विश्रांती घेतल्या नंतर रस्त्यावर डांबर टाकून रस्ता बनविणे राहिले दूरच पण रस्त्याला पाणी मारून फक्त यात फुकटचा वेळ वाया जात आहे.यामुळे कोरोना विषाणू पेक्षा धुळीमुळे प्रवाशी अधिक त्रस्त झाले असून वाहनचालकांसह प्रवाशी वर्गाच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असुन यांच्या जिवाचा खेळ मांडला आहे.

      चार ते पाच दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे महामार्ग पूर्णपणे सुकले असुन याचे रूपांतर धुळीत झाले आहे.ही सर्व धुळ प्रवाश्यांच्या व महामार्गावरील परिसरात असणाऱ्या गावातील नागरिकांच्या अंगावर उडत आहे यामुळे येथील नागरिकांच्या व प्रवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.ही धूळ नागरिकांच्या नाका तोंडात जाऊन सर्दी, खोकला, व श्वसनाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.

      मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरी करणाचे काम गेली अकरा ते बारा वर्षांपासुन अतिशय मंद गतीने सुरु असुन हे काम केव्हा पुर्ण होईल याची खात्री देता येत नाही परंतु पाऊस पडला तर या मार्गावर चिखल व खड्डे यामुळे प्रवाशी वर्ग त्रस्त होतात यामुळे कंबर दुखी सारखे आजार तर पाऊस बंद झाल्यावर धुळीमुळे खोकला,सर्दी या सारखे आजार होतांना दिसत आहेत.टूव्हिलर वरुन प्रवास करणाऱ्यांना तर सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत असुन उडणारी धुळ प्रवाशांच्या डोळ्यात उडत आहे यामुळे अपघात ही होतांना दिसत आहे.याला पर्याय म्हणून रस्त्यावर पाणी फवारणी केली जात आहे परंतु ऑक्टोबर हिट मुळे रस्ता थोडया वेळाने सुकला जात असुन परिस्थिती जैसे थे अशीच आहे याचा त्रास वाहनचालक, प्रवाशी वर्ग व पदचारी यांना सहन करावा लागत आहे.

Comments

Popular posts from this blog