साई हायस्कूलचे चंद्रकांत आधिकारी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
माणगाव (भिवा पवार) शिक्षणासह सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांचा रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करत असते.गतवर्षी माणगाव तालुक्यातून साई विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकमान्य ज्ञानदिप विद्यामंदिर साई हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक श्री.चंद्रकांत आधिकारी सर यांची निवड करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्यावतीने किरवली ,ता.कर्जत येथे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे यांच्या हस्ते रा.जि.प.अध्यक्षा योगिता पारधी,शिक्षक आमदार मा.बाळाराम पाटील, समाज कल्याण सभापती गिताताई जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
आदिवासी विदयार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे व त्यांना विविध सुविधा उपलब्ध करून शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे ,खेळ व विविध स्पर्धां मध्ये गोडी निर्माण करून विशेष सराव व मार्गदर्शन करून तालुका ,जिल्हा व विभाग स्तरावरील सांघिक व वैयक्तिक खेळात नैपुण्य प्राप्त करून देणे, त्याचबरोबर शाळेतील आपल्या विषयावर विविध प्रकारचे उपक्रम हाती घेऊन ते यशस्वी रित्या राबवून निकालाच्या उच्चांकांची उज्ज्वल परंपरा कायम ठेवणे ,शैक्षणिक उन्नती बरोबरच झाडांची लागवड ,संवर्धन समाजातील अंधश्रद्धा ,व्यसनाधीनता याविषयीची पंचक्रोशीत जनजागृती केली आहे. आखाडा या विषयात त्यांना विशेष गती असल्याने विद्यार्थ्यांना ते विविविध कसरतीचे मार्गदर्शन करतात. शाळेसाठी भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता ते विशेष प्रयत्नशील असतात. शिवाय शिक्षक संघटनेच्या माध्यमातून तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असताना विविध प्रकारचे प्रलंबीत प्रश्न सोडवतात. अशा या बहुआयामी शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने त्यांचे संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत आहे.चंद्रकांत आधिकारी सरांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल साई विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गजानन आधिकारी ,उपाध्यक्ष बळीराम लाड ,सचिव गणेश पवार ,सदस्य सुभाष जाधव ,क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष शंकर पवार ,सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जाधव ,माणगाव तालुका उपसभापती सुजित शिंदे ,प्रशांत आधिकारी ,राजू मोरे ,सुरेश वाघ ,साई कोंड अध्यक्ष शिवाजी सावंत ,ग्रामस्थ नरेश आधिकारी ,दिनकर आधिकारी ,श्रीराम नलावडे ,प्रकाश टेटविलकर ,महादेव आधिकारी ,विहुले पोलीस पाटील गोविंद ढऊळ, शिक्षक सेना कोकण विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे ,रायगड जिल्हा अध्यक्ष रविंद्र पाटील, माणगाव तालुका शिक्षक सेना उपाध्यक्ष नितीन नवगणे ,जूनी हक्क पेन्शन संघटनेचे माणगाव तालुका अध्यक्ष राजन पाटील ,उपाध्यक्ष पानवकर सर ,सचिव विदयाधर आधिकारी तसेच माणगाव तालुक्यातील अनेक सामाजिक , राजकीय,शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील -म्हात्रे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,विदयार्थ्यांनी सरांचे अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment