प्रवासी व मालमत्ता सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस सदैव तत्पर:- वरीष्ठ मंडळ     सुरक्षा आयुक्त जितेंद्र                  श्रीवास्तव 


 रोहा (समीर बामुगडे )
  
अष्टमी हे मध्य व कोकण रेल्वे वरील महत्वाचे स्थानक  आहे.कोकण रेल्वे सेवा सुरु झाल्यापासून स्थानक व रेल्वे गाड्यांचे मधून प्रवाश्यांच्या कडील मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याच्या घटनांचे प्रमाण जास्त होते.यासोबतच रेल्वेची मालमत्ता चोरीला जात होती. मात्र या घटना कोणत्या मार्गाने होतात याचा रेल्वे पोलीस व स्थानिक पोलिसांनी सहकार्याने शोध लावत यावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले आहे.पनवेल रोहा पुढे कोकणरेल्वे मार्गावरील रेल्वे सेवाभौगोलिकपरिस्थीतीचा विचारकरत याभागात जास्तीतजास्त तरुण रेल्वे पोलीस जवानांची नेमणूक करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे या मार्गावर होणाऱ्या सर्व प्रकारच्या चोऱ्या कमी करण्यात व रेल्वे प्रवाश्यांना संपूर्ण सुरक्षा देण्यात मध्य रेल्वे प्रशासन व पोलीस यशस्वी होत आहेत. आगामी काळात प्रवासी व रेल्वे मालमत्ता यांची सुरक्षा करण्यास आम्ही कटिबंध असून सुरक्षिततेच्या दृष्टीने राहिलेल्या तृटिंची प्रत्यक्ष पाहणी करून त्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे.यादृष्टीने स्थानिक पत्रकार व प्रवासी यांच्याशी संवाद साधत त्यांच्या कडून यासंदर्भात आलेल्या सुचना सुरक्षा नियोजनासाठी महत्वपूर्ण असतील.असे आवाहन मध्य रेल्वे वरीष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांनी रोहा रेल्वे स्थानकाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना केले. कोरोना प्रादुर्भाव कमी होताच त्यांनी शुक्रवार १ ऑक्टोंबर रोजी रोहा रेल्वे स्थानकास भेट देत येथील सुरक्षा यंत्रणेची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी आवर्जून रोहा मधील सर्व स्थानिक पत्रकारांचे जवळ संवाद साधला यावेळी रोहा रेल्वे पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांचेसह रायगड जिल्हा पत्रकार संघटना अध्यक्ष महादेव सरसंबे, अमोल पेणकर, महेंद्र मोरे,नितीश सकपाळ, महेश मोहिते, निलेश ठमके,समीर बामुगडे,नंदकुमार बामुगडे, दिप वायडेकर आदी रोहा मधील विविध वृत्तपत्रे व माध्यमांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. 

   देशभारत मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच संपूर्ण लॉकडाउन लागत रेल्वे सेवाही पुर्णतः बंद होती.आता कोरोना प्रादुर्भाव कमी होताच हळूहळू रेल्वे सेवाही पुर्वपदावर येत आहे.कोरोना काळात रेल्वे पोलिसांनी रेल्वे च्या मालमत्तेचे रक्षण करत प्रवाश्यांची सुरक्षा करण्याचे आपले कर्तव्य पार पाडले. रोहा हे मध्य व कोकण रेल्वे मार्गावरील महत्वाचे स्थानक असल्यामुळे यामार्गावर कोठेही काही घटना घडल्यास प्रवासी रोहा स्थानकाच्या आसपास असा उल्लेख करत असतात.यामार्गावर अजूनही स्वतंत्र जीआरपी पोलीस यंत्रणा नसल्यामुळे रेल्वे पोलीस व स्थानिक पोलीस यांना यासर्व घटनांचा तपास करत नागरिकांना सुरक्षा देण व त्यांचे मौल्यवान एवज परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत.रायगडचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक,यांचे यासाठी नेहमीच रेल्वे प्रशासनाला सहकार्य लाभत आहे.कोरोना नंतर आता सर्व पुन्हा पुर्वपदावर येत असल्यामुळे रोहा स्थानकातील सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उणिवांची माहिती घेत त्यावर उपाययोजना करण्यात येतील.रोहा रेल्वे पोलीस चौकी अंतर्गत येणारा सोमाटणे ते रोहा या १०२ किलोमीटर मार्गावर येथील अधिकारी व जवान आपले कर्तव्य अत्यंत चांगले पार पाडत असून आज त्यांचे बरोबर चर्चा करून त्यांना अधिक प्रोत्साहन आपण देणार असल्याचे सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांनी सांगितले.रोहा स्थानकाचा विस्तार पाहता अधिकचे सीसीटीव्ही कॅमेरे व अन्य उपाययोजना करण्यावर भर देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog