सुदर्शन कंपनीच्या वतीने पत्रकारांचा सन्मान,

अडचणीच्या ठिकाणी उभे राहतात तेच खरे पत्रकार!- माहिती अधिकारी मनोज सानप,

कोलाड (श्याम लोखंडे ) : रायगड जिल्हा अलिबाग रेवदंडा येथे रायगड जिल्हा रोहा तालुक्यातील नामांकित व रासायनिक उद्योगात अग्रेसर असलेली तसेच संपूर्ण जगभरात उत्पादन क्षेत्रात नावलौकिक अशी सुदर्शन कंपनीच्या माध्यमातून तालुक्यातील पत्रकार मित्र यांना कोरोना योद्धा म्हणून रेवदंडा येथील सुप्रसिद्ध रिसॉर्ट The Fern Silvanus येथे स्नेहभोजन व सत्कार समारंभ सोहळा ज्येष्ठ पत्रकार संपादक अरुण खोरे, रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप व कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट विवेक गर्ग यांच्या मुख्य उपस्थितीत व खेळीमेळीच्या वातावरणात आलेल्या सर्व पत्रकारांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. 

रोहा औद्योगिक क्षेत्रातील सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज आणि पत्रकार बंधू यांचे एक अतूट नाते आहे. गेल्या दीड वर्षांपासून पत्रकार मित्रांनी कोरोनाच्या कठीण काळातही पत्रकार आपली सेवा बजावत आहेत. या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, तसेच पत्रकारांचा सन्मान करावा आणि स्नेहबंध आणखी दृढ व्हावा, या उद्देशाने पत्रकार बांधवांसाठी छोटेखानी स्नेहमेळावा व सुसंवाद-सन्मान कार्यक्रम याप्रसंगी आयोजित करण्यात आला होता. यावेळी रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी रोहा पत्रकारांच्या कामाचा गौरव करत खरोखरच अडचणीच्या ठिकाणी उभे राहतात तेच खरे पत्रकार! असे गौरवोद्गार काढले. त्यातच प्रमुख अतिथी लाभलेले तथा ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे (पुणे) यांनी कंपनी व्यवस्थापकीय कामकाजबद्दल कौतुकाची थाप देत सामाजिक बांधिलकी म्हणून सुदर्शनच खूप मोठं योगदान असल्याचे सदरील प्रोजेक्टरच्या माध्यमातून केलेल्या कामांची चित्रफीत यावेळी सी एस आर च्या प्रमुख माधुरी सणस यांनी प्रदर्शित केली असता यावर देखील सखोल मार्गदर्शन करत सामाजिक बांधीलकीची जोपासना करत ग्रामीण भागातील महिलांना साक्षरतेचे धडे देत व्यवसायाची निर्मिती केली असल्याचे पहावयास मिळाल्याचा आनंद यावेळी व्यक्त केला,प्रसंगी सर्व पत्रकार बंधू यांच्या वतीने आभार प्रदर्शनामध्ये ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके यांनी पत्रकारांच्या वतीने आभार व्यक्त केले. तसेच कंपनीच्या जनसंपर्क विभागाच्या प्रमुख माधुरी सणस यांनी कंपनीचे सामाजिक कार्य आणि वैशिष्ट्यांबद्दल तसेच उद्दिष्टे येणारे पुढील उपक्रम याबाबत माहिती दिली.

प्रसंगी यावेळी विवेक गर्ग उपाध्यक्ष सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लि,सौ.माधुरी सणस, DGM सीएसआर &ऍडमिन, Media,सी.बी.जोशी, DGM,सिव्हील ,वैभव नाईक, DGM,पर्यावरण, आरोग्य आणि सुरक्षा.माध्यम सल्लागार जीवराज छोले ,आदी व्यवस्थापकीय उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला कोरोना काळात पत्रकार बंधूंना आपत्कालीन मरण पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड.विशाल घोरपडे (जनसंपर्क अधिकारी),आभार प्रदर्शन.रवी दिघे (Admin Executive)व -तांत्रिक सहाय्य- रुपेश मारबते(Sr.Executive CSR) यांनी करत या सर्वांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा व स्नेहभोजन कार्यक्रमाने सांगता करण्यात आली.


Comments

Popular posts from this blog