रोहा रोठ खुर्दमध्ये गणेशमूर्तींची कामे अंतिम टप्प्यात, विविध आकर्षक गणेशमूर्ती तयार!उत्सुकता आगमनाची ,
कोलाड (श्याम लोखंडे ) : गणेशोत्सव जवळ आल्याने उत्सुकता आगमनाची त्यामुळे सर्व गणेशभक्त गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत. त्याचबरोबर गणेशमूर्ती कारखानदारांनी देखील श्रीमूर्तींच्या रंगकामांमध्ये अखेरचा टप्प्याचे काम जोमाने सुरू असल्याचे दिसत आहे .
रोहा तालुक्यातील रोठ खूर्द येथील योगेश कला केंद्र या गणेशमूर्ती कारखान्यामध्ये विविध प्रकारच्या मूर्ती घडविण्यात आलेल्या असून त्यामध्ये टिटवाला, म्हैसुरी, सोफा फर्निचर, लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, फिलीप्स, शिवरेकर यांसारख्या विविध प्रकारच्या आकर्षक गणेशमूर्तींचा समावेश आहे. या आकर्षक मूर्ती पाहण्यासाठी येथे नेहमीच अनेकांची रीघ लागलेली असते. या कारखान्यातील मूर्ती दरवर्षी तालुक्यात विविध ठिकाणी रवाना होत असतात.
यावर्षी श्रीमूर्तींची मागणी वाढल्यामुळे आमचे कारागीर जोमाने कामाला लागले असून ते श्रीमूर्तींच्या रंगकामावर अखेरचा हात फिरवीत आहेत असे येथील गणेशमूर्ती कारखानदार योगेश हातखामकर व किरण मोरे यांनी सांगितले. तसेच, आकर्षक गणेशमूर्तींसाठी इच्छुकांनी मोबाईल क्र. 7666414863, 7066661013 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment