वडघर हायस्कूलचा    नाविन्यपूर्ण उपक्रम, 

 आदिवासी विद्यार्थी व पालका़ची सहविचार सभा,   

ॲड.श्री अनिकेतजी ठाकूर,या़चे अनमोल मार्गदर्शन, 

   आदिवासी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,


                                                                                                          माणगाव ( प्रतिनिधी )                                     छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित सरस्वती विद्या मंदिर वडघर मुद्रे ,ता.माणगाव ,जि.रायगड ही शाळा अतिशय दुर्गम व डो़गराळ भागात आहे.या शाळेचा लौकिक म्हणजे ही शाळा सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण आहे. शाळेचा सतत 9 वर्षे इ.१० वी चा निकाल १००% लागत आहे. गतवर्षी झालेल्या N.M..M.S. परीक्षेत कु .भूमी धुमाळ हीने संपूर्ण। रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.

    या शाळेत आदिवासी गरिब ,गरजू विद्यार्थी शिक्षण घेतात.परिसरातील १० गाव़ व ८ वाडया़तून ६ ते ७ कि मी पायी चालत येवून प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण घेत आहेत. या शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांची उपस्थिती कायम रहावी या करिता शाळा अनेकविध उपक्रम राबवित असते.    

           मंगळवार दि .७ सप्टेंबर २०२१ रोजी शाळेत आदिवासी विद्यार्थी व पालका़ची सभा आयोजित करण्यात आली होती. या पालक सभेचे उदघाटन जनसेवा स़ंघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. ऍड. श्री.अनिकेत ठाकूर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शारदा मातेचे पूजन करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत। शाळेच्या मुख्याध्यापिका सो .अंजली धारसे ,दक्षिण रायगड आदिवासी हितरक्षक संघटनेचे अध्यक्ष उमेश जाधव ,बबन कोळी ,,जनसेवा संघटनेचे सचिव योगेश पालकर ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य चंद्रकांत खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

        उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना ऑड.श्री .अनिकेत ठाकूर यांनी विद्यार्थी व पालक यांना जीवनात शिक्षणाचे महत्त्व , ,स्वयंरोजगार ,स्थलांतरावर मात करण्याचे उपाय ,अज्ञानामुळे मुला -मुलींचे १८ वर्षाच्या आत लग्न लावून देणे कायदयाने गुन्हा आहे ,वाढती व्यसनाधीनता ,आरोग्याच्या सवयी ,चांगल्या लोकांच्या संपर्कात राहणे ,स्वतः च्या कष्टावर विश्वास ठेवणे असे महत्त्वाचे मुद्दे समोर ठेवून सहज सोप्या भाषेत प्रसंगानुरूप कथन करून पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ग्रामीण भागातील ही शाळा आपल्या विदयार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्कार देत आहे. या शाळेचे व माझे नाते अतूट आहे .ते असेच राहिल यात शंका नाही असे श्री .ठाकूर साहेबांनी सांगितले.



          कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .अंजली धारसे यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पालकांचे विशेषतः आईचे मोठे योगदान आहे हे लक्षात घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवले पाहिजे. याचवेळी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री .भिवा पवार सर यांनी केले तर सुत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.राजन पाटील सर यांनी केले.

Comments

  1. उत्कृष्ट कार्यक्रम, मनपूर्वक शुभेच्छा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog