प्रेरणा मतिमंद मुलांच्या शाळेची नवीन कार्यकारिणी जाहीर 


      गोवे -कोलाड  (  विश्वास निकम  )  रोहा येथील ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था संचलित प्रेरणा मतिमंद मुलांच्या शाळेची नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली .प्रेरणा मतिमंद मुलांच्या शाळे ची दिनांक २६ /०९ / २०२१रोजी ४.३० वाजता दगडी शाळा मेहेंदळे हायस्कूल समोर शाळेच्या हाल मध्ये घेण्यात आलेल्या जाहीर सभेत पुढीलप्रमाणे बिनविरोध निवड करण्यात आली अध्यक्षपदी सौ. दर्शना आठवले, उपाध्यक्ष संजय आर्ते , सचिव अशोक जोशी , सहसचिव राजश्री आठवले, खजिनदार रामनरेश कुशवाहा , सहखजिनदार श्री निवास वडके , सदस्य श्रिया जोशी सदर सभेमध्ये मागील सभेचा अजेंडा वाचुन मंजूर करण्यात आला , अध्यक्षा दर्शना आठवले यांनी हिशोब वाचुन झाले नंतर सर्वानुमते मंजूर करण्यात आला. अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी च्या विषयांवर विचार विनिमय करण्यात आले. या वेळी अध्यक्षांनी शाळे विषयी माहिती देताना सांगितले आपली आपली शाळा ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था ही एक शासनमान्य स्वयंसेवी संस्था आहे मुलांच्या / व्यक्तींच्या क्षेत्रात २ ऑक्टोबर २००६पासून १५वर्षे अविरतपणे सुरू आहे या शाळेत ३५ विद्यार्थी विशेष सेवांचा लाभ घेत आहेत ते पुढे संस्थेच्या भविष्यातील योजनांची माहिती देताना म्हणाले संस्थेच्या स्वतःच्या मालकीची जागा व सुसज्ज इमारत, संस्थे साठी वाहनं व्यवस्था, वस्तीगृहा, व्यवसायिक प्रशिक्षण केंद्र, शिक्षक प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय, संशोधन केंद्र आदी योजना आहेतं त्या डोळेंच्या समोर ठेवून नवनिर्वाचित कमेटी कामं करायचा आहे सदर सभा खेळीमेळीच्या वातावरण संपन्न झाली

Comments

Popular posts from this blog