कोलाड येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी मोठया उत्सहात साजरी,

             गोवे-कोलाड(विश्वास निकम )                रायगड जिल्हा नाभिक तरुण संघाचे जिल्हा अध्यक्ष सुदामजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि.४सप्टेंबर २०२१ रोजी कोलाड विभाग तरुण संघ यांच्या तर्फे श्री. संतसेना महाराज पुण्यतिथी कोलाड येथील सदानंद साळूंखे यांच्या दुकानात मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.  

            यावेळी जिल्हा विश्वस्त यशवंत खराडे, जिल्हा उपाध्यक्ष व कोलाड विभाग माजी अध्यक्ष सदानंद साळूंखे, जिल्हा सल्लगार प्रभाकर मोहिते, यांच्या शुभहस्ते संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी वसंत खराडे,विनायक दिवेकर,अशोक खराडे, रोहिदास मोहिते, सतीश दिवेकर,विजय रावकर,काशिनाथ रावकर,संजय रावकर, प्रशांत मोहिते,विजय पवार,कल्पेश टक्के, अनिल खराडे, संतोष खराडे, संतोष पवार, विलास पवार, निलेश पवार,नितेश मोहिते,प्रकाश जाधव, नथुराम दिवेकर, राहुल भोसले, शंकर दिवेकर,आत्माराम दिवेकर,सचिन माने, जिल्हा महिला प्रतिनिधी वंदना खराडे,सारिका साळुंखे,शिवानी मोहिते, रोहिनी मोहिते,प्रभावती मोहिते,दिपाली टक्के, अश्विनी कदम,गुलाब खराडे,व बहुसंख्य नाभिक समाज बांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog