रोहा आमडोशी येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना कार्यशाळेस महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

वाकण -नागोठणे (वर्षां जांभेकर )रोहा कृषिविभागाच्या वतीने बुधवार दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी आमडोशी येथील श्री हनुमान मंदिर सभागृहात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महिला सक्षमीकरणासाठी या योजना कशा लाभदायक आहेत याचे मार्गदर्शन या वेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांना केले. महिलांनी स्वतःच्या कर्तृत्वाने आपला छोटा उद्योग उभा करावा व आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. तसेच महिला बचत गट व महिला समुहाने एकत्रित संघटित होऊन काम करणे गरजेचे असल्याची माहिती यावेळी उपस्थितांनी दिली .

उत्स्फुर्तपणे प्रतिसाद लाभलेल्या विविध गावांतून आलेल्या बचत गटांच्या प्रमुख महिला पदाधिकारी यांना शासन आपणास हातभार लावण्यासाठी विविध योजना कार्यान्वित करीत आहे,आपण त्यांचा लाभ घेतला पाहिजे तसेच विविध प्रकारचे बी बियाणे यांचे प्रात्यक्षिक करून पीक योजना राबवली पाहिजे तसेच भात पिकांवरील कीड रोग व त्यांचा पादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रकाच्या औषधांची योग्यवेळी फवारणी करावी असे प्रतिपादन कृषी पर्यवेक्षक जे एल मढवी यांनी केले तसेच या योजनांची चांगल्या प्रकारे माहिती उपस्थित महिलांना दिली. यावेळी वांगणी ग्राम पंचायत मध्ये कार्यरत असलेल्या एकूण सतरा बचत गटांतील प्रमुख महिला व महिला समूहाच्या प्रमुख व बचत गटांच्या बँक सखी वर्षा जांबेकर यांनी वांगणी आमडोशी परिसरातील व गावातील महिला बचत गटांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत सहकार्य करण्याचे आवाहन केले.यावेळी कृषी सहायक सुनील भोईर कृषी पर्यवेक्षक जे.एल.मढवी यांनी महिलांना मार्गदर्शन केले. ग्रापंचायत सदस्या सुनीता जांभेकर शुभांगी जांभेकर रोशनी भोसले आदी बचत गट समूहाच्या महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन बँक सखी वर्षा वासुदेव जांबेकर यांनी केले.अभार प्रदर्शन बचत गट समूहाच्या सी आर पी दीपाली गोळे यांनी केले तसेच कार्यक्रम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी येथील सर्व उपस्थित महिलांनी अथक परिश्रम घेतले ,

Comments

Popular posts from this blog