कोलाड शिवसेनेचा ढाण्या वाघ, शंकर उर्फ (भाऊ ) भगत, काळाच्या पडद्याआड कोलाड शिवसेना पोरकी,

              गोवे-कोलाड (विश्वास निकम )

        रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात शिवसेनेला बळकटी देणारे स्व बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे समर्थक म्हणून कोलाड येथे शिवसेना स्थापन करण्यासाठी मोठे योगदान दिले सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना जशास तसे उत्तर देत भगवा हाती घेत पक्के शिवसैनिक म्हणून नैतिकता जोपासत कोलाड आंबेवाडी विभागात शिवसेनेचा पाया मजबूत करत खरे किंग मेकर ठरत शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून मोठा दबदबा असलेले शंकर (भाऊ ) भगत यांचे आकस्मित निधनानंतर कोलाड आंबेवाडी शिवसेना पोरकी झाली आहे ,

      कोलाड आंबेवाडी विभाग रोहा तालुक्यातील आंबेवाडी नाका येथील रहिवासी शंकर उर्फे (भाऊ) भगत यांचे गुरुवार दि.२सप्टेंबर २०२१ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्यूसमयी यांचे वय ७६ वर्षाचे होते. ते निष्ठावंत शिवसैनिक होते तसेच कोलाड विभाग प्रमुख होते.त्यांचे तरुणांना मार्गदर्शन हे नेहमीच प्रेरणादायी ठरत होते.त्यांनी नेहमी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता.ते कोलाड परिसरातच नव्हे तर स्व बाळासाहेब ठाकरेंसह रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक भाऊ या नावाने सर्वाना परिचित होते.तसेच सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमी सक्रिय होते त्यांच्या निधनाने भगत परिवार तसेच कोलाड आंबेवाडी विभागात शोककळा पसरली आहे.      भाऊ भगत यांच्या निधनाची वार्ता कळताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी कोलाड आंबेवाडी परिसरातील व्यवसायिक,विविध पक्षाचे कार्यकर्ते, तसेच सामाजिक, शैक्षणिक, व विविध क्षेत्रातील मान्यवर सोशल डिस्टन्सचा पालन करीत उपस्थित होते.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,सुधीर,कैलास दोन मुले,अश्विनी एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे, व मोठा भगत परिवार आहे.

त्यांचे पुढील दशक्रिया विधी शनिवार दि.११ सप्टेंबर तर उत्तरकार्य तेरावे विधी रविवार दि.१२ सप्टेंबर २०२१ रोजी आंबेवाडी नाका येथील त्यांच्या राहत्या निवास्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकवर्तीयांकडून प्राप्त झाली आहे .

 आदिवासी समाजाचा दिशादर्शक, मार्गदर्शक हरपला :भिवा पवार

      भाऊ भगत निधनाने आदिवासी समाजाची फार मोठी हानी झाली असून आदिवासी समाजाला वेळोवेळी सहकार्य करणारे तिच्यातच एक मार्गदर्शक  हरपला असल्याची रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटननेचे जिल्हाध्यक्ष भिवा पवार यांनी पत्रकारांशी व्यक्त केले. ज्या ज्या वेळेला आदिवासी समाजावर अन्याय व्हायचचे त्या त्या वेळी भाऊ आदिवासीं समाजाच्या यांच्या मदतीसाठी वेळोवेळी धावून यायचे आदिवासी समाजावर भाऊंचे  खूप मोठे ऋण आहेत.आदिवासी समाजाला मदत करताना कधीही पक्षपात हा भेद त्यांनी केला नाही. भाऊ भगत  यांचे निधना ने आदिवासी समाजाचा  मार्गदर्शक, दिशादर्शक, आधारस्तंभ हरपले असल्याचे मत रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भिवा पवार यांनी पत्रकारांशी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog