खा. सुनिल तटकरे यांच्या निर्देशाने रोह्याला पूर्णवेळ तालुका भूमी निरीक्षकांची नेमणूक!

अडीच वर्षे जागा होती रिक्त रोहा तालुका सिटीझन फोरमने  केलेली मागणी 






         रोहा ( प्रतिनिधी)                                              रोहा तालुक्यासाठी असलेले उपअधिक्षक भूमिअभिलेख हे पद गेली अडीच वर्ष रीक्त होते. परिणामी या कार्यालयाच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी येत होत्या. नागरिकांची ओरड लक्षात घेऊन रोहा तालुका सिटीझन फोरमचे निमंत्रक आप्पा देशमुख यांनी हा विषय खा. सुनिल तटकरेंकडे मांडून त्यांच्याकडे योग्यतो पाठपुरावा केला. नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन खा. तटकरे यांनी यांनी संबंधितांना योग्यते निर्देश दिल्याने रोहयाला पूर्णवेळ तालुका भूमी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. 

रोह्यासाठी टीएलआर यांची तातडीने पूर्णवेळ नियुक्ती केल्याबद्दल रोहा तालुका सिटीझन फोरमचे निमंत्रक आप्पा तथा प्रदीप देशमुख यांनी खा. सुनिल तटकरे यांचे आभार मानले, गुरुवारी देशमुख यांच्यासह फोरमच्या शिष्टमंडळाने नवनियुक्त टीएलआर माळवे यांची भेट घेऊन त्याचे स्वागत केले. यावेळी रोहा तालुका सिटीझन फोरमचे अध्यक्ष नितीन परब, प्रशांत देशमुख, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष शशीकांत मोरे, राजेंद्र जाधव, रविंद्र कान्हेकर, रविना मालुसरे, वरसे उपसरपंच मनोहर सुर्वे, मिलिंद अष्टीवकर आदी उपस्थीत होते. यावेळी नागरिकांना भेडसावणाऱ्या वरीलप्रमाणे सर्व विषयांवर माळवे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली, तसेच नागरिकांना सुलभ व्हावे यासाठी कार्यालयात मार्गदर्शक सूचना फलक लावण्यात यावे अशी त्यांच्याकडे मागणी करण्यात आली.

 प्रतिक्रिया

जमीन मोजणी, इत्यादी संबंधित कामासाठी नागरिकांनि सरळ कार्यालया मध्ये संपर्क करावे, दलालाकडे जाऊ नये. नागरिकांची कुठे अडवणूक होत असल्यास तसेच कोणी पैशांची मागणी करीत असल्यास मा. टीएलआर साहेब तसेच आमच्याकडे संपर्क करावे.

-- प्रदीप तथा आप्पा देशमुख, निमंत्रक सिटीझन फोरम.

टी एल आर ऑफिसचे कामकाज लोकाभिमुख करण्याचा आमचा सर्वोतोपरी प्रयत्न राहील, नागरिकांना त्यांच्या कामामध्ये काहीही त्रास अथवा कोणतीही अडचण आल्यास त्यांनी माझेकडे आवश्य संपर्क करावे.

-- नंदकुमार माळवे, उपअधीक्षक, भूमी अभिलेख रोहा

Comments

Popular posts from this blog