मुंबई -गोवा महामार्गा वरील सुकेळी खिंडीतील पोलीस चौकी असून नसल्या सारखीच,
गोवे=कोलाड ( विश्वास निकम )
नागोठणे पासून जवळच असणाऱ्या सुकेळी खिंडीमध्ये मध्ये असलेल्या पोलीस चौकीत शुकशुकाट दिसत असून या ठिकाणी फक्त गणेशोत्सवाच्या काळात पोलीस तैनात असते. इतर दिवशी ही पोलीस चौकी सुनीसुनी असते.
सुकेळी खिंडीच्या महामार्गावर वेडीवाकडी जीवघेणी वळण आहेत. रस्त्याच्या एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला खोल दरी आहे. या खिंडीच्या परिसरात अनेक वेळा मोठे मोठे अपघात ही या अगोदर झालेले आहेत. या मार्गावर पथ दिले नसल्यामुळे रात्रीच्या अंधारात या खिंडीतून मोठ्या मुश्किलीने वाहनं चालवावी लागतात.
येथील रस्ता हा मुंबई-गोवा महामार्ग असल्यामुळे रात्रं-दिवस लहान-मोठी वाहने सातत्याने ये-जा करत असतात. या वाहनांबरोबर अवजड वाहन सुद्धा मोठ्या प्रमाणावर धावत असतात. या परिसरात रात्री अपघात झाला तर अपघात ग्रस्तांना मदत करण्यासाठी कोणीच नसते. त्यामुळे अपघात ग्रस्तांना नागोठणे किंवा कोलाड येथे असलेल्या दवाखान्यात हलवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागते. मुख्य म्हणजे सुकेली खिंडीत मोबाईलला रेंज नाही.
या पोलीस चौकीमध्ये फक्त गणपती सणामध्ये तसेच दिवाळी सणामध्ये पोलीस तैनात असते. या ठिकाणी नेहमी पोलिस तैनात असणे अत्यंत गरजेचे आहे. तरच अपघात ग्रस्तांना मदत आणि भरधाव वाहनं चालविणाऱ्यांवर आळा बसेल आणि अनेकांना पोलिसां बरोबर संपर्क साधता येईल असे वाहनचालकांसह प्रवाशी वर्गातून बोलले जात आहे.
Comments
Post a Comment