सार्वजनिक गणेशोत्सव रोहाच्या वतीने शुक्रवारी आरोग्य शिबिर   
       सिम्बायोसिस स्पेशालिटी  हॉस्पिटल मुंबईचे तज्ञ डॉक्टर  उपस्थित राहणार     

          गोवे-कोलाड (विश्वास निकम )

रायगड जिल्ह्यातील एक गाव एक गणपती म्हणून प्रसिद्धीस आलेल्या रोहा तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट रोहाच्यावतीने शुक्रवारी सिम्बायोसिस स्पेशालिटी हॉस्पिटल मुंबई यांच्यावतीने पालकमंत्री आदिती तटकरे,आ. अनिकेत तटकरे यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा रोहेकर यांनी लाभ घ्यावा असे आव्हान सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.

या शिबिरात मोफत हृदयविकार, अस्तिविकार, बालरोग, नसाविकार व सामान्य विकारांची चिकित्सा करण्यात येणार आहे. हे शिबिर शुक्रवारी १७ सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत भाटे सार्वजनिक वाचनालय रोहा येथे घेण्यात येणार आहे.

या शिबिरात मोफत रक्तदाब तपासणी, मोफत रक्तशर्करा तपासणी, मोफत इलेक्ट्रोकार्डिओग्राम तपासणी, मोफत टू डी इको तपासणी, मोफत स्ट्रेस टेस्ट, मोफत हृदयरोग तज्ञ मार्गदर्शन, मोफत नसाविकार तज्ञ मार्गदर्शन, मोफत अस्तिविकार तज्ञ मार्गदर्शन, मोफत बालरोग तज्ञ मार्गदर्शन, मोफत जनरल सर्जन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यानंतर पुढील उपचारासाठी सवलती दरात ऍन्जिओग्राफी, मोफत, सवलतीच्या दरात अंजिओप्लास्टी, सवलतीच्या दरात नसाविकार शस्त्रक्रिया, सवलतीच्या दरात अस्तिविकार शस्त्रक्रिया, सवलतीच्या दरात सामान्य शस्त्रक्रिया मुंबई येथील सिम्बायोसिस स्पेशालिटी हॉस्पिटल येथे करण्यात येणार आहे.या शिबिरात सिम्बायोसिस स्पेशालिटी हॉस्पिटल मुंबई दादर येथील तज्ञ डॉक्टरांची टीम असणार असून यामध्ये दहा नर्सेसचा समावेश असणार आहे.

ज्यांना या शिबिरात सहभागी व्हायचे आहे त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचे  राजेश काफरे, नीलेश शिर्के, निखील दाते, सिम्बायोसिस स्पेशालिटी हॉस्पिटल चे समन्वयक अजित अनंत पाशिलकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog