रोहा तालुक्यात गोमातेची कत्तल करून मांस रातोरात लंपास पहूर फाट्यानजीक घडला प्रकार
कोलाड परिसरात एकच खळबळ
गोवे-कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यात हिंदू संस्कृतीला काळीमा फासेल अशी दुर्दैवी घटनाच म्हणावी लागेल असा प्रकार घडला असल्याचे निदर्शनास येत असून कोलाड परिसरात गो मातेची कत्तल करून रातोरात मांस लंपास केला गेला असल्याचे दिसून येत आहे या घटनेने कोलाड सुतारवाडी परिसरात एकच खळबळ माजली आहे ,
या बाबत सविस्तर माहिती अशी की रोहा तालुक्यातील पहूर फाटा म्हणजे मुबंई गोवा महामार्गाला जोडला गेलेला मार्ग कोलाड भिरा पुणे मार्गावर असलेला पहुर फाट्या नजीक असलेल्या खडी क्रेशर जवळ काही अज्ञातांनी गो मातेची हत्या करत तिला कापून तिचा मांस रातोरात टेम्पोमध्ये भरून लंपास केले असल्याचे संकेत मिळत असून सदरच्या घटनेबाबत परिसरात एकच खळबळ उडाली असून ही हिंदू संस्कृतीला काळीमा फासणारी घटनेचा निषेध सर्वत्र व्यक्त केला जात आहे ,
भारत देशात हिंदू संस्कृती म्हणून गो मातेची पूजा केली जाते आशा गो मातेची विटंबना करत तीची दुर्दैवी हत्या करून मांस लंपास केला जातो याला काही या देशात राज्यात सुसूत्रता आहे की असे बोलले जात आहे .सदरच्या या ठिकाणी गाईचा पोटला त्याच प्रमाणे रक्ताचा सडा मोठ्या प्रमाणावर जमिनीवर पडलेला दिसत आहे. अशीच एक घटना आठ दहा दिवसांपूर्वी म्हणजे गणपती विसर्जनानंतर ढोकळेवाडी नजीक घडली. येथे चक्क बैलाला कापून त्याचा मास विक्रीसाठी नेल्याची घटना घडल्याचा प्रकार घडला होता .
मुबंई गोवा महामार्ग,रोहा कोलाड मार्ग तसेच कोलाड भिरा पुणे मार्गावर लगतच्या ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणावर उनाड गुरं रस्त्यावर तसेच जंगलात संचार करत असतात. त्यांच्या राखणीसाठी कोणी नसतो. याचा फायदा गुरे चोरणारी टोळी घेते आहे. काही दिवसांपूर्वी ग्रामीण भागात गुरे चोरणारी टोळी सक्रिय होती. रात्री मोकाट गुरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन त्यांना टेम्पोतून नेत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत . परंतु आता याच मोकाट गुरांची जंगलातच कत्तल करून ते मांस नेण्याइतपत मजल गुरे चोरट्यांनी मारत असल्याचे सदरच्या घटनेवरून दिसून येत आहे .
गो मातेची कत्तल करून तिचा मांस लंपास करणं ही हिंदू संस्कृतीला काळीमा फासेल असे कृत्य आहे आपल्या संस्कृतीत तीची पूजा केली जाते परंतु दुर्दैवाने तिची कत्तल करत तिची विटंबना केली जात आहे त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. ज्या ठिकाणी गायची कत्तल केली आहे त्या ठिकाणी मोठी दुर्गंधी पसरली आहे. या गुरं चोरणाऱ्यां टोलींचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी केली जात आहे.
Comments
Post a Comment