ना.म.जोशी विद्याभवन गोरेगाव येथे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा मुख्याध्यापक संघाच्यावतीने भव्य सत्कार

 शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा

  माणगाव ( राजन पाटील )शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच संस्था चालकांचे कित्येक वर्षे प्रलंबित असणारे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असणारे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष तथा शिक्षक सेनेचे कोकण विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा भव्य सत्कार माणगाव तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने ना म..जोशी विदया भवन गोरेगाव येथेकरण्यात आला.

यावेळी मंचावर शिक्षक सेना रायगड जिल्हा अध्यक्ष मा.श्री .रविंद्र पाटील सर ,मुंब ई विभाग शिक्षक सेना सचिव लखीचंद ठाकरे सर ,माणगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.विजयकुमार विश्वनाथ पारकर सर ,उपाध्यक्ष श्री.राजेंद्र पवार सर सचिव अर्जुन कुशिरे सर ,जे.बी .सावंत हायस्कूल चे मुख्याध्यापक कांबळे सर,पेण तालुका शिक्षक सेना अध्यक्ष सुरेश मोकल ,श्री .गुलाब दवणे सर,श्री.विजय राणे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नवीन शिक्षक संच मान्यता ,D C P S व NPS चा रोखीने हप्ता न दिल्या बद्दल ,सही करण्याचा अधिकार पत्र तात्काळ मिळणे ,शालेय कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या 1 तारखेला मिळावे ,P F स्लीपा न मिळाल्याबाबत ,जि.प. शिक्षण विभाग भोंगळ कारभार वत्यावर उपाययोजना आदी मागण्यांवर साधक -बाधक चर्चा करण्यात आली व या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे अभिवचन मा.श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी निवेदन स्वीकारताना दिले. सदर सभेला माणगाव तालुक्यासह तळा ,महाड। पोलादपूर ,म्हसळा ,श्रीवर्धन तालुक्यातील मुख्याध्यापक व पर्यवेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Comments

Popular posts from this blog