खांब चिल्हे देवकान्हे बाहे विभागातील साखरचौथ गणरायांना भक्तिमय वातावरणात निरोप
कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील खांब चिल्हे देवकान्हे विभागातील खांब नडवली तळवली तर्फे अष्टमी चिल्हे धानकान्हे देवकान्हे आणि बाहे मुठवली खुर्द या गावात कोरोना संसर्गाचा व शासकीय यंत्रणेचा पालन करत संकष्टी चतुर्थी निमित्त सार्वजनिक साखरचौथीच्या गणरायाची प्रतिष्ठापना पूजन करून हा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात व उत्साहात साजरा करण्यात आला. खांब येथे खांबकर आळी येथे गेली आठ वर्षांपासून संजय भोसले तसेच पाचवे वर्ष खांब येथे टवले आली येथे या सार्वजनिक उत्सवाला सुरवात केली तसेच नडवली येथे उदय व्यायाम मित्र मंडळ आणि जाधव कुटूंबियाच्या वतीने आपली नेहमीची परंपरा कायम राखत लहान थोरांशी हा उत्सव भक्तिभावाने साजरा करत आहेत तर तळवली तर्फे अष्टमी येथे जय हनुमान मित्रमंडळाने तळवली गावठाण येथ नंदकुमार मरवडे यांच्या निवस्थानी प्राण प्रतिष्ठापना करत गेली सहा वर्षांपासून हा उत्सव साजरा करत ग्रामस्थ महिला मंडळ युवक युवती एकत्रित येऊन मोठ्या भक्ती भावाने उत्सवाचा आनंद घेत साजरा करतात तसेच चिल्हे येथे पाचवा वर्ष धाक्सुद क्रीडा मंडळाने तसेच ग्रामस्थ महिला मंडळ व युवती एकत्रित येऊन गणपतीची प्राणप्रतिष्ठापना पूजन हरिपाठ महाआरती सोहळा करत मोठया श्रद्धेने पूजन हरिपाठ भजन व महिलांचा फेरा नाच गाणी म्हणत आनंदात साजरा करण्यात आले आहे. तसेच धांनकान्हे येथे खडक आली येथे या आळीच्या वतीने ओंकार कचरे यांच्या निवास्थानी परंपरा कायम राखत हा उत्सव मोट्या भक्ती भावाने साजरा केला जातो देवकान्हे येथे आपली पंरपंरा जोपासत गाव मंडळी व भोईर मंडळी या मंडळांच्या वतीने तसेच गावात मोहिते परिवारांच्या वतीने देखील हा उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा केला , तसेच बाहे येथे शिवप्रेमी व गावदेवी मित्रमंडळ बाहे यांच्या सहकार्याने गेली अनेक वर्षांपासून या गावात या दिवशी युवक मंडळ ग्रामस्थ महिला व युवती यांच्या वतीने मूर्तीची प्रतिष्ठापना करतात तर देवीची मुठवली येथे युवक मंडळ युवती ग्रामस्थ महिला मंडळ यांच्या वतीने सालाहाबादप्रमाणे उत्सव साजरा करत आहेत.
खांब देवकान्हे विभागातील साखरचौथीच्या राजाला शनिवारी सायंकाळी प्रशाकीय यंत्रणेचा तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा पालन करत भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप देत राज्यावर देशावर व संपूर्ण जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर कर सर्वांना सुखी ठेव अशी प्रार्थना करत शांतता पूर्ण उत्साह वातावरणात खांब नडवली तळवली तर्फे अष्टमी चिल्हे धांनकान्हे देवकान्हे बाहे आणि मुठवली खुर्द या विभागातील जनतेने भक्तिमय वातावरणात व आनंदाने दिड दिवसाच्या साखरचौथीच्या गणरायाला निरोप दिला,
प्रसंगी यावेळी कोरोना संकटाचे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा पालन करत कोलाड खांब देवकान्हे सह विभागातील भाविकांनी गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप दिला तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोलाड विभागीय पोलिस यंत्रणेकडुन गावो गावी कोरोनाचे व कायदा आणि सुव्यवस्थेच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
Comments
Post a Comment