मालसई येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना कार्यशाळेस महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा कृषिविभागाच्या वतीने बुधवार दिनांक २२ सप्टेंबर २०२१ रोजी मालसई येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महिला सक्षमीकरणासाठी या योजना कशा लाभदायक आहे याचे मार्गदर्शन या वेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांना केले. महिलांनी स्वतःच्या कर्तृत्वाने आपला छोटा उद्योग उभा करावा व आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. तसेच महिला बचत गट व महिला समुहाने एकत्रित संघटित होऊन काम करणे गरजेचे आहे.शासन आपणास हातभार लावण्यासाठी विविध योजना कार्यान्वित करीत आहे,आपण त्यांचा लाभ घेतला पाहिजे असे प्रतिपादन कृषी पर्यवेक्षक दिगंबर साळे यांनी केले.सुतार यांनी या योजनांची चांगल्या प्रकारे माहिती उपस्थित महिलांना दिली. यावेळी रविना मालुसरे यांनी मालसई गावातील महिला बचत गटांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी पर्यवेक्षक दिगंबर साळे,सुतार व पल्लवी उबाळे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच रसिका मालुसरे तसेच मालसई मधील महिला बचत गटांच्या पदाधिकारी, महिला मंडळाच्या पदाधिकारी व गावातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog