रायगड स्नेही सेवा-सहयोग प्रतिष्ठान,रायगड या संस्थेचा स्तुत्य उपक्रम,    








   पाली-सुधागड ( विशेष प्रतिनिधी)

रायगड स्नेही सेवा- सहयोग प्रतिष्ठान, रायगड या संस्थेने शिक्षक दिनाचे औचित्य साधून सुधागड तालुक्यातिल कोंडजाई हायस्कूल नागशेत तसेच संत नामदेव माध्यमिक व कनिष्ठ विद्यालय-नांदगाव आणि माणगाव तालुक्यातील टाटा विद्यालय भिरा, कुंडलिका हायस्कूल पाटणुस, माध्यमिक कनिष्ठ विद्यालय विळा आणि ग.रा.मेथा माध्यमिक व कनिष्ठ विद्यालय- निजामपूर या ६ ठिकाणी संस्थेच्या वतीने तेथील शिक्षकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केल्या.

या ठिकाणी मनोगत व्यक्त करताना या संस्थेचे कार्यकर्ते श्री रमेश ढेबे म्हणाले की आजचा दिवस हा राष्ट्रासाठी समर्पित युवा पिढी घडवणाऱ्या शिक्षकांचा सन्मानाचा त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. सोशल मीडियाच्या अधिक वापरामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. परंतु ही दरी मिटवली पाहिजे.

    शिक्षक हा हृदयाला पाझर फोडून डोळ्यातुन अश्रूंची नदी वाहणारा असतो त्यामुळे त्याचा योग्य तो सन्मान राखला गेला पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा शिक्षक-विद्यार्थी-समाज यांचं नात निर्माण झालं पाहिजे आणि हे नातं आणखी मजबूत झालं तर या भारताला जगात कोणीही रोखू शकत नाही. भारत हा जगाला मार्गदर्शन करेल जगाचा गुरू हा भारत असेल आणि हे गुरूपद याची देही याची डोळा पाहायला मिळेल हा विश्वास व्यक्त केला.

 या कार्यक्रमप्रसंगी प्रतिष्ठाचे पदाधिकारी रमेश ढेबे, रोहन दगडे, अजय धानुधरे, विनायक भोसले, ओंकार नलावडे, दिनेश शिंदे इ. उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog