पत्नीने धंद्यावर जाण्यास नकार दिला म्हणून पतीने केला पत्नीचा खून,

 फरार पती जंगलात जाऊन, झाडावर लपून बसला असताना पोलिसांनी शिताफिने आवळल्या मुसक्या,

कोलाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, सुभाष जाधव, व त्यांच्या पथकाचे सर्वत्र कौतुक,

     

   रायगड (भिवा पवार )पत्नीने धंद्यावर ऊसतोडणीसाठी जाण्यास नकार दिल्याने त्याचे पर्यावसन भांडणात झाल्याने पतीने पत्नीस लाथाबुक्क्यानी तसेच  डोक्यास  मारहाणी केली.या मारहाणी मध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रोहा तालुक्यातील कोलाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत आंबिवली आदिवासीवाडी मध्ये घडली. त्यानंतर आरोपी फरार झाला होता पोलिसांनी कसून तपास केला असता, घटनास्थळापासून आसपासच्या जंगलामध्ये फरार झाला होता. जंगलात एका झाडावर चढून बसलेल्या स्थितीत पोलिसांना तपासात  आढळून आला या झाडावर चढून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळण्यात कोलाड पोलिसांना यश आले आहे.

      याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक  31ऑगस्ट  रोजी रोहा तालुक्यातील कोलाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या आंबिवली आदिवासी वाडी येथील आरोपी चंदर सुदाम वाघमारे वय 41वर्षे याने आपली पत्नी ऊसतोडी साठी धंद्यावर जाण्याच्या कारणावरून भांडण झाले यामध्ये आरोपीने पत्नीस लाथाबुक्क्यांनी मारहाण व डोक्याला ही गंभीर दुखापत झाली होती त्यातच तिचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली होती. मात्र त्या नंतर आरोपी फरार झाला होता. सदर आरोपी चंदर सुदाम वाघमारे हा जंगलात लपून बसला होता मोबाईल, आधारकार्ड नसतानाही अधिकारी अंमलदार यांनी गुन्हा झाल्यापासून घटनास्थळ व आसपासच्या जंगलात एका झाडावर लपून बसलेल्या आरोपीस शिताफीने अटक केली असून कोलाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव व त्यांच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी तसेच कोलाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुभाष जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन मयताची पाहणी केली तसेच साक्षीदारांची विचारपूस केली. 

              या घटनेची पोलीस ठाण्यामध्ये पोस्टे गुरनं        007/2021भा.द.वी.कलम302नोंद झाली  असून अधिक तपास कोलाड पोलिस स्टेशचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ए. एल. घायवट,एन. आर.पाटील, व कोलाड पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे.

 एकत्मिक प्रकल्प अधिकारी आदिवासी रोजगारबाबत शून्य नियोजना मुळे आदिवासी महिलेचा बळी :शशिकांत जगताप, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण रायगड दरवर्षी आदिवासींच्या विकासासाठी रोजगारासाठी करोडो रुपये खर्च करीत असतात मात्र हे करोडो रुपये रोजगाराच्या योजना मूळ योजना आदिवासी समाजापर्यंत पोहोचत नसून त्या कागदावरच पोहोचत असल्याची खंत येथील पदवीधर आदिवासी युवक शशिकांत जगताप यांनी व्यक्त केली असून आदिवासी समाजाला रोजगार दिला तर परजिल्ह्यात ऊस तोडणीसाठी अथवा कोळसा भट्टी साठी आदिवासी जाणार नाहीत त्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प खात्याने प्रामाणिकपणे प्रयत्न करून आदिवासींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात प्रयत्न करावेत अशी मागणी आदिवासी कार्यकर्ते शशिकांत जगताप यांनी केलीअसून जर स्थानिक आदिवासींना या जिल्ह्यातच रोजगार निर्मिती आदी  वासी प्रकल्प  खात्याने  रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या तर असे प्रकार घडणार नाहीत असे ते म्हणाले.

Comments

Popular posts from this blog