एस.टी.महामंडळाच्या वाहतूक  नियंत्रकांचा मनमानी कारभार,

बस स्थानकाऐवजी धाब्यावर होते वाहतूक नियंत्रण,

लवकरच परिवहन मंत्री यांच्या कडे होणार तक्रार,

 माणगाव (प्रतिनिधी )आधीच एस.टी.महामंडळ अनेक कारणांमुळे डबघाईला आले असताना आता रायगडातील मुंबई -गोवा महामार्गावर चालणाऱ्या एस.टी.बस सेवेच्या वाहतूक नियंत्रकांनी सर्वांच्या समोर सुलतानी संकट निर्माण करून ठेवल आहे. एस.टी. वाहतूकीचे नियंत्रण बस स्थानकात अथवा बस आगारात होण्याऐवजी वाहतूक नियंत्रक स्वतः चा मनमानी कारभार, स्वार्थापोटी एस.टी बसचे नियंत्रण धाब्यावरकरीत असल्याने प्रवाशांमध्ये व समस्त नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली असल्याने ते याबद्दल थेट परिवहनमंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहेत.
याबाबतचे सविस्तर माहिती अशी आहे की, प्रत्येक एस.टी.आगार व बस स्थानकावर प्रवासी व एस .टी वाहक -चालक यांच्या सेवेसाठी अल्पदरात चहा ,नाष्टा व जेवणाची व्यवस्था कॅन्टींग करित असते. याचा रितसर भाडा मोबदला संबंधित हॉटेल चालक अथवा कॅन्टींग चालक एस.टी महामंळास देत असते. या सर्व परिक्रमेत सर्व कामगार लोकांचा पोटापाण्यासाठीचा प्रश्न सुटत असतो. मात्र याच बस स्थानकातील वाहतूक नियंत्रकांच्या धाब्यावरील एस.टी .नियंत्रणामुळे या सर्वांच्या पोटावर मारले जात आहे.यांच्या धाब्यावरील एस.टी .थांब्यामुळे वाहतूक नियंत्रक विशिष्ट कमिशन मिळवतात मात्र एस.टीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वडापाव 30/- चहा- 20/- मिसळ -60/- रु .अशा चढया दराने विकले जातात.हा सर्व प्रकार  एस.टी. ने नेमून दिलेल्या  सर्वच धाब्यांवर  घडत आहे. नाईलाजाने प्रवासी हे सर्व सहन करतात मात्र या घटनांचे प्रमाण वाढल्याने या एस .टी वाहतूक नियंत्रकांच्या मनमानी ,स्वार्थी ,लबाडी धोरणा विरोधात प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री .राजन पाटील हे मा.परिवहनमंत्री यांच्या कडे लवकरच तक्रार करणार आहेत.

आमच्या प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना ही सर्व माहिती दिली आहे.


Comments

Popular posts from this blog