झोतीरपाडा ग्रामपंचायत उपसरपंच पदी प्रसाद कुथे, यांची निवड
पेण (प्रतिनिधी )
पेण तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या झोतीरपाडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी प्रसाद कुथे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
झोतीरपाडा ग्रामपंचायतिच्या सरपंच ज्योती तरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या उपसरपंच पदाच्या नवडणुकीत झोतीरपाडा ग्रामपंचायतिच्या सदस्यांनी सर्वानुमते खेळीमेळीच्या वातावरणात उपसरपंच पदी प्रसाद कुथे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या वेळी उपस्थित सरपंच ज्योती तरे, ग्रामसेवक संजय जाधव, सदस्य नरेश पाटील, दिनेश कुथे, कोमल कुथे, प्रणाली पाटील, विश्वनाथ उतेकर, रोहिणी आल्हाट, रेखा साबळे, प्रणाली कोळी, अक्षता पाटील, शुभांगी भोईर इत्यादी सदस्य, ग्रामस्थ व तरुण उपस्थित होते.
Comments
Post a Comment