गोवे येथील तरुणांनी

 जोपासाला पिढ्यान -पिढ्या

 चालत असणारा सारिपाटाचा   खेळ                                  


                        गोवे - कोलाड (विश्वास निकम)

             संस्कृती टिकली, तरच देश टिकेल, संस्कृती जिवंत रहावी नवीन पिढीला या संस्कृतीचे  ज्ञान व्हावे म्हणून पिढ्यान पिढ्या चालत असणारा   बुद्धीला चालना देणारा खेळ सारिपाटाचा खेळ,  मात्र हा  सारीपाटाचा खेळ मात्र ह्या इंटरनेटच्या युगात लोप पावत असताना तो जिवंत राहावा म्हूणन तो जोपासला आहे रायगड जिल्ह्यातील रोहा  तालुक्यातील गोवे येथील तरुणांनी,

गणेश उत्सवामध्ये जागरण म्हणून परिचित असणारे सर्व खेळ हळूहळू लोप पावत असतांना गोवे येथील तरुणांनी आधुनिक काळात ही सारिपाटाचा खेळ जोपासला आहे. कौरव पांडवा पासून चालत आलेला सारिपाटाचा खेळ हा गणेश उत्सवा पासून दसऱ्या पर्यंत जागरण म्हणून बुद्धीचा वापर करुन खेळण्यात येणारा खेळ हा पुर्ण होण्यासाठी तीन ते साडेतीन तास लागतात.

                    पिढ्यान-पिढ्या पासून चालत असणारा सारिपाटाचा खेळ हा मोठया बुद्धीचा वापर करुन खेळला जातो. परंतु भावी तरुण पिढी या जुन्या खेळा पासून दूर होत असतांना दिसत आहेत.अशा परिस्थितीत गोवे गावातील या खेळात पारंगत असलेले जेष्ठ नागरिक रामा होनाजी गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली हा खेळ जोपसला जात आहे.

                   रामा गुजर यांच्या मार्गदर्शना खाली तरुण वर्गातील लीलाधर दहिंबेकर,प्रशांत गुजर,चंद्रकांत पवार, निलेश दहिंबेकर,जयसिंग पवार,अजित दहिंबेकर,कल्पेश सुर्वे,आकाश दहिंबेकर,साहिल दहिंबेकर,सार्थक दहिंबेकर, हरिचंद्र गुजर,अरुण दहिंबेकर,हे तरुण सारिपाटाचा खेळ आपल्या बुद्धीचा वापर करुन जोपासत आहेत.

Comments

Popular posts from this blog