कोलाड, खांब,देवकान्हे, विभागातील पाच दिवसाच्या गौरी गणपती बाप्पांचे विसर्जन मोठ्या भक्तिमय वातावरणात , 






कोलाड (श्याम लोखंडे ) मुंबई-गोवा महामार्ग लागत जोडल्या गेलेल्या कोलाड खांब देवकान्हे विभागातील ग्रामस्थांनी नजिक असलेल्या कुंडलिका,महिसदरा नदीत तसेच या परिसरातील तलाव या ठिकाणी पाच दिवसाच्या गणपती बाप्पा व गौरींचे विसर्जन कोरोना संकटावर मात करत व सोशल डिस्टनचा पालन करत भक्तिमय वातावरणात बाप्पांना निरोप देण्यात आला.मुंबई-गोवा महामार्गावरील लगत असणाऱ्या कोलाड-आंबेवाडी,वरसगाव, पुई, पुगाव,गोवे,मुठवली, शिरवली, खांब, वैजनाथ,व परिसरातील नडवली, तळवली तर्फे अष्टमी, चिल्हे , धानकान्हे, बाहे, देवकान्हे सह विभागातील अन्य आदिवासी वाड्यापाड्यांवरील सर्व गणेश भक्तांनी गणरायाला गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या आणि राज्यासह देशावर व संपूर्ण जगावर आलेल्या कोरोना संसर्ग विषाणूचे संकट दूर कर अशी मनोभावे प्रार्थना करत गणरायांचे विसर्जन केले. तसेच पायी हळु हळु चाला । मुखाने गजानन बोला ।। अशा जयघोष नामस्मरणात पाच दिवसाच्या गणरायांना व गौरींना भक्तिमय वातावरणात व थाटामाटात निरोप देण्यात आला,तसेच भक्तांकडून एकच प्रार्थना करण्यात आली की सर्व ठिकाणी आलेले कोरोनाचे संकट दूर कर सर्वांना सुखी ठेव अशी गणरायाकडे पार्थना करण्यात आली.

प्रसंगी यावेळी कोरोना संकटाचे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा पालन करत कोलाड खांब देवकान्हे सह विभागातील भाविकांनी व ग्रामस्थ नागरिकांनी गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप दिला तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोलाड विभागीय पोलिस यंत्रणेकडुन गावो गावी कोरोनाचे व कायदा आणि सुव्यवस्थेच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्या सूचनांचे पालन करत जवळील नदीपात्र तलावात मूर्ती आणि गौरींचे विसर्जन करण्यात आले .


Comments

Popular posts from this blog