रोह्यात सापडलेल्या त्या अर्भकाचे उपचारादरम्यान मृत्यू!
त्या निर्दयी मातेला ईश्वर माफ करेल का?
त्या निर्दयी मातेच्या कृत्याचा,जिल्ह्यात संताप,
रोहा (समीर बामुगडे )
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना दिनांक 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता समोर आली होती . यामागे एक २१ वर्षीय युवक नेहमीप्रमाणे गुरे चरायला घेऊन गेला असता शेजारील कब्र स्थानात त्याला जोरा जोरात कावळ्याचा ओरडण्याचा आवाज आला इतक्या मोठ्या प्रमाणात कावळे ओरडत आहेत याचा संशय त्याला आला असता त्याने झुडपात पाहिले त्याला एक नवजात शिशु जोरात रडत होते हे दिसून आले कावळे तोच मारत होते. त्या बालकाच्या डोक्यावर कावळ्याने चोच मारून जखम केली होती तसेच झुडुपातील किड्यामुंग्यांनी चावून त्याच्या अंगावर ही इजा केली होती हे सगळे विदारक दृश्य पाहून त्या २1 वर्षीय मुलाने क्षणाचाही विलंब न लावता त्या नवजात बालकाला कपड्यात गुंडाळले व घटनेची माहिती रोहा पोलीस स्टेशनला दिली व रोहा पोलीस स्टेशने घटनेचे गांभीर्य ओळखून घटना ठिकाणी धाव घेऊन सदर अर्भकाला प्राथमिक उपचार म्हणून रोहा सरकारी हॉस्पिटलला हलविण्यात आले. व त्यानंतर पुढील उपचारासाठी अलिबाग सरकारी हॉस्पिटल येथे हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान नवजात शिशु आज सकाळी पाचच्या सुमारास काळाने घाला घातला व नवजात शिशु मरण पावले असून स्वतःच्या पोटच्या गोळ्याला अशा पदी टाकून देणाऱ्या आई वडिलांच्या कृत्याचा रायगड जिल्ह्यात संताप वक्त होत असून आई-वडिलांचा शोध रोहा पोलिस स्टेशनचे पोलीस घेत असून अधिक तपास रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शना खाली हवालदार पाटील करत आहे.
Comments
Post a Comment