थरमरी आदिवासी वाडी येथे हुतात्मा नाग्या महादू कातकरी स्मुर्तीदिन मोठ्या उत्साहात संपन्न
निजामपूर (प्रतिनिधी ) माणगाव तालुक्यातील निजामपूर जवळील थरमरी येथे 25 सप्टेंबर रोजी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या स्मृती दिन साजरा करण्यात आला. नाग्या बाबांना अभिवादन करण्यासाठी चिरनेर -उरण येथे सर्वांनाच जाता येत नाही त्यांचा इतिहास सर्वांना माहित होत नाही. नाग्या बाबांचा इतिहास लहानापासून मोठ्यांपर्यंत कळावा त्यापासून प्रेरणा घेऊन नवीन क्रांती निर्माण करावी यासाठी थरमरी आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवांनी यावर्षी हुतात्मा नाग्या बाबांचा थरमरी आदिवासी वाडीतच स्मृतिदिन साजरा केला.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटना जिल्हाध्यक्ष पत्रकार भिवा पवार हे उपस्थित होते पत्रकार भीवा पवार यांनी नाग्याबाबा याच्या जीवनातील अनमोल माहिती ग्रामस्थांना दिली. तसेच दक्षिण रायगड जिल्हा हित रक्षक संघटनेचे माणगाव तालुका अध्यक्ष उमेश जाधव, सचिव संतोष वाघमारे,केशव वाघमारे, यांनी हे अनमोल मार्गदर्शन ग्रामस्थांना केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी थरमरी आदिवासी वाडीतील अध्यक्ष अनंत मोरे, उपाध्यक्ष सोनू जाधव, धोंडू जाधव, प्रमोद काटकर, यशवंत कोळी, विकास वाघमारे भगवान काटकर महादेव जाधव तसेच वनमित्र राम कोळी यांनी तसेच ग्रामस्थ व महिला मंडळ यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
Comments
Post a Comment