प्रत्येक सामाजिक उपक्रमात रिलायन्स इंडस्ट्रिजचा मोलाचा वाटा-: आमदार अनिकेत तटकरे
सुतारवाडी ( हरिश्चंद्र महाडिक )
सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान आणि रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 24 सप्टेंबर 2021 रोजी कोविड-19 चे 800 डोस येरळ ग्रामपंचायत, जामगाव ग्रामपंचायत आणि कुडली ग्रामपंचायत अशा तीन ग्रामपंचायती मिळून देण्यात आले.
या डोसाचा शुभारंभ येरळ ग्रामपंचायतीच्या कार्यालयात विश्वनाथ बंगाल यांना डोस देऊन करण्यात आला. या 800 डोस चा शुभारंभ विधानपरिषद सदस्य आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते येरळ ग्रामपंचायत, ग्रामपंचायत जामगाव, आणि ग्रामपंचायत कुडली येथे करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार अनिकेत तटकरे यांनी सांगितले प्रत्येक सामाजिक उपक्रमात रिलायन्स इंडस्ट्रीजचा मोलाचा वाटा आहे. खासदार सुनिलजी तटकरे साहेबांनी सामाजिक उपक्रमासाठी ज्या ज्या वेळी मागणी केली त्या त्या वेळी रिलायन्स इंडस्ट्रिजचा मोलाचा वाटा असतो. रिलायन्स इंडस्ट्रीजने प्रत्येक ग्रामपंचायतीला डोस देण्यासाठी डाटा तयार करण्यासाठी वेगळी टीम तयार करून कॉम्प्युटरची सुद्धा उत्तम व्यवस्था केली. हे काम कौतुकास्पद असल्याचे अनिकेत तटकरे यांनी सांगून ते पुढे म्हणाले दोन डोस पूर्ण झाल्यानंतर मोदींचा फोटो असलेला प्रमाणपत्र मिळतो. फोटोपेक्षा प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता आहे कारण गेल्या वर्षी कोरोना मुळे पंढरपूरची वारी झाली नाही मात्र पुढील वर्षी नक्की वारी ला जाता येईल. आज पहिला डोस दिला गेला, दुसरा डोस वेळेतच सर्वांना मिळेल.
या प्रसंगी सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानचे राकेश शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे ग्रुप हेड अविनाश श्रीखंडे, अध्यक्ष शशांक गोयल, हेड एच आर चेतन वाळंज, वरिष्ठ व्यवस्थापक रमेश धनावडे, आदींनी विशेष मार्गदर्शन व सहकार्य केले. तसेच डॉक्टर भानुप्रताप दुबे, डॉक्टर गजानन ससाने, डॉक्टर प्रितेश मोहन, डॉक्टर संदीप सालवे, डॉक्टर प्रिया चौधरी, डॉक्टर सुशांत जाधव, डॉक्टर सौरभ पटाईत या डॉक्टरांनी विशेष मेहनत घेतली.
यावेळी ग्रामपंचायत येरळच्या सरपंच सौ. विमल दळवी, तसेच सर्व सदस्य त्याचप्रमाणे ग्रामपंचायत जामगाव सरपंच सर्व सदस्य, तसेच कुडली ग्रामपंचायत सरपंच सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष दळवी ( पोलीस पाटील )यांनी केले. या कोविड-19 डोस साठी प्रत्येक ग्रामपंचायती मधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला
Comments
Post a Comment