माणगाव तालुक्यातील देगाव आदिवासी वाडीतील ग्रामस्थांचा कोवीड लसीकरण शंभर टक्के   करण्याचा संकल्प,

 एका दिवसात झाले 167 बांधवांचे लसीकरण, 50 जण लस उपलब्ध झाल्यावर घेणार

देगाव आदिवासीवाडी ग्रामस्थांवर  जिल्ह्यातुन होतोय, अभिनंदनाचा वर्षाव 

                                    रायगड (भिवा पवार )                                    कोविड -19 कोरोना व्हायरसच्या वाढत्या महामारीच्या आव्हानांना  आणि धोक्याला तोंड देण्यासाठी आपण तयार आहोत ते सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकार व भारत सरकार आवश्यक ती पावले उचलत आहे स्थानिक पातळीवर व्हायरस चा प्रसार रोखण्याचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे नागरिकांना योग्य माहिती देऊन सक्षम करून त्यांना कोविड  लसीकरण करणे आहे.




मात्र कोवीड  लसीकरण बाबतीत आदिवासी समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने काही संभ्रम, तसेच  भीती वाटत असल्याने लसीकरण याच्या प्रक्रियांमध्ये आदिवासी वाड्यांवर आरोग्य सेवकांना एकदम कमी प्रतिसाद मिळत होता आरोग्य अधिकाऱयांना याची जाणीव होती. 

मात्र माणगाव तालुक्यातील देगाव आदिवासीवाडी ग्रामस्थ याला अपवाद ठरले असून एका दिवसात जवळजवळ 167 आदिवासी बांधवांनी लस घेतले असून अजून 50 आदिवासी बांधव लस घेणार आहेत  लस उपलब्ध झाल्यानंतर लस घेणार आहेत असून शासनाला सहकार्य करून शंभर टक्के लसीकरण करून देगाव आदिवासीवाडी शंभर टक्के लसीकरण करून वाडी कोविड मुक्त करण्याचा संकल्प आदिवासी ग्रामस्थांनी केला आहे.

काल दिनांक 22 सप्टेंबर रोजी देगाव आदिवासी वाडीवर झालेल्या लसीकरणात 167 आदिवासी बांधवांनी लस  घेतली असून उर्वरित50बांधव लस उपलब्ध झाल्यानंतर बांधव घेणार आहेत हे लसीकरण यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र साई उपकेंद्र मोर्बा विभाग आरोग्य सहायिका अंजली मंचेकर, आरोग्य सेविका सविता रणखांबे, आरोग्य सेवक अमोल दहातोंडे, आशा सेविका मेघा मंबर्डे,डाय ऑपरेटर सेजल महाडिक, कर्मचारी लाड, हे उपस्थित होते.

या कोवीड -19 चे  लसीकरणाच्या मोहिमे वाडीतील ग्रामस्थांचे योगदान महत्त्वाचे होते यामध्ये देगाव आदिवासी वाडी गावचे अध्यक्ष बबन पवार, महादेव सोनू मुकणे, रामा पवार, रमेश पवार, सखाराम पवार, श्रीराम हिलम, वसंत हिलम यशवंत पवार,वामन पवार,कल्पेश पवार या ग्रामस्थांनी तसेच ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी वाडीतील शिक्षित युवक भारत विष्णू पवार,अल्पेश रामा पवार यांनी विशेष मेहनत घेतली.

रायगड जिल्ह्यामध्ये कोविड च्या लसीकरणाबाबत प्रथमच उत्स्फूर्त प्रतिसाद देगाव आदिवासी वाडीचा असून शंभर टक्के लसीकरण या निर्णयाचे  रायगड जिल्ह्यात कौतुक होत असून देगाव आदिवासी वाडीतील ग्रामस्थांचे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

  1. अति सुंदर सर आमच्या गावातील लोकांना संपर्क चांगला असल्या मुले आमच्या वाडीतील सर्व लोकांनी लस घेण्यास प्रवृत्त झाले☺️☺️

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog