
रोहा तालुक्यातील घटना! कालव्याच्या पाण्यात बुडून इसमाचा मृत्यू,आंबेवाडी येथील घटना कोलाड (विश्वास निकम ) सोमवार दि.७ जुलै २०२५ रोजी दुपारी ३.२५ वाजता रोहा तालुक्यातील कोलाड जवळीलआंबेवाडी येथील गणेश नगर येथे कालव्याच्या पाण्यात तोल जाऊन एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार आंबेवाडी येथील गणेश नगर येथील कालव्याच्या पाण्यात तोल जाऊन गजानन लक्ष्मण जंगम वय ४८ वर्षे रा. आंबेवाडी,गणेश नगर येथील इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असुन घटनास्थळी कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांनी भेट दिली.तसेच सहयाद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेची टीम दाखल झाली त्यांच्या मदतीने सदर मयत इसमाचा मृत्यूदेह कालव्याच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आला.अधिक तपास कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा आंबेतकर करीत आहेत.