गोरेगाव -रायगड येथील दोशी वकील महाविद्यालयात करियर कट्टा मार्गदर्शन आणि इंडक्शन कार्यशाळा संपन्न गोरेगाव:(सृष्टी पवार) माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे दोशी वकील आर्ट्स कॉलेज अँड जी. सी. यु. बी. सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, गोरेगाव, तालुका - माणगाव, जि.रायगड, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये करियर कट्टा इंडक्शन-जागृती कार्यशाळा शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी उत्साहात पार पडली. याप्रसंगी करिअर कट्टा विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. होटकर सर यांनी मार्गदर्शन केले. करियर कट्टा समन्वयक प्रा. डॉ. सुभाष कदम आणि डॉ. गणेश सानप यांनी करिअर कट्टा आपल्याला स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार कसा बनवू शकतो, याविषयी विद्यार्थ्यांना इत्यंभूत माहिती दिली. करियर कट्टा विभागाकडून पुरवल्या जाणाऱ्या विविध सोयी- सुविधा आणि उपक्रमांविषयी चे व्हिडिओज मुलांना दाखवण्यात आले. करियर कट्टा च्या ॲप मध्ये...