शिष्यवृत्ती परीक्षेत रायगड जिल्हा परिषद शाळा वहाळच्या नेत्रदीपक यश 

पनवेल(प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे सन 2025 आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत रायगड जिल्हा परिषद शाळा, वहाळ (ता. पनवेल, जि. रायगड) येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

या परीक्षेत रुही नरेश पाटील (५९.३३%), आरोही रविशकुमार चौधरी (५८.००%), प्रतिक्षा किरण बेळ्ळे (५७.३३%), सोनिका सोपान माने (५२.६६%), प्रांसी तेजस म्हात्रे (४९.३३%), हिबा मोहम्मद अहमद खान (४८.६६%), महारुद्र नानासाहेब खेडकर (४६.६६%) आणि अनुष्का मनोज डांगे (४०.६६%) यांनी उल्लेखनीय गुण मिळवत यश संपादन केले.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे वर्गशिक्षिका सौ. श्रुतिका राजन पाटील यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, सर्व शिक्षकवृंदाचे सहकार्य तसेच पालकांचे प्रोत्साहन मोलाचे ठरले. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षक, केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या यशामुळे रायगड जिल्हा परिषद शाळा, वहाळच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली असून परिसरात विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे 

Comments

Popular posts from this blog