Posts

Showing posts from July, 2026
Image
  शिष्यवृत्ती परीक्षेत रायगड जिल्हा परिषद शाळा वहाळच्या नेत्रदीपक यश  पनवेल(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे सन 2025 आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत रायगड जिल्हा परिषद शाळा, वहाळ (ता. पनवेल, जि. रायगड) येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या परीक्षेत रुही नरेश पाटील (५९.३३%), आरोही रविशकुमार चौधरी (५८.००%), प्रतिक्षा किरण बेळ्ळे (५७.३३%), सोनिका सोपान माने (५२.६६%), प्रांसी तेजस म्हात्रे (४९.३३%), हिबा मोहम्मद अहमद खान (४८.६६%), महारुद्र नानासाहेब खेडकर (४६.६६%) आणि अनुष्का मनोज डांगे (४०.६६%) यांनी उल्लेखनीय गुण मिळवत यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामागे वर्गशिक्षिका सौ. श्रुतिका राजन पाटील यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, सर्व शिक्षकवृंदाचे सहकार्य तसेच पालकांचे प्रोत्साहन मोलाचे ठरले. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षक, केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामुळे रायगड जिल्हा परिषद शाळा, वहाळच्या शैक्षणि...
Image
अभिनव विद्यामंदिर पारनाका कल्याण येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न  कष्टाविना विना फळ नाही, कष्ट करा यशाचा अभिमान बाळगा,गर्व करू नका,माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा आदर्श बाळगा:- प्रा.नारायण फडके    कल्याण (प्रतिनिधी) नुकताच कल्याण येथील अभिनव विद्यामंदिर पारनाका येथे छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण आयोजित करण्यात आलेल्या   माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा 2026 च्या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभात संस्थेचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. नारायण फडके विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले "की  कष्टाविना फळ नाही, कष्ट करा यशाचा अभिमान बाळगा, गर्व करू नका,माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा आदर्श बाळगा. असे प्रतिपादन प्रा.नारायण फडके यांनी केले ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणात बोलत होते.  कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन   वंदे मातरम या गीताने झाली. यावेळी व्यासपीठावर छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणचे कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.नारायण फडके ,सरचिटणीस डॉ.निलेशजी रेवगडेतसेच  प...
Image
  रोहा तालुक्यातील घटना!       पुराच्या पाण्यामुळे गोवे       गावातील   रस्ता गेला वाहून भातशेतीचे मोठे नुकसान!     कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील कोलाड परिसरात गोवे गावातील रस्ता तीन चार दिवस पडलेल्या ढगफुटी सारख्या  तुफान पावसामुळे रस्ता पूर्णपणे वाहून गेला असुन या रस्त्यावरुन गोवे गावात जाण्यासाठी  रिक्षा,फोरव्हीलर व इतर वाहने जाण्यासाठी जागाच राहिली नसल्याने या मार्गांवरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. याशिवाय या पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांनी पेरून ठेवलेला राब पुराच्या पाण्यात कुजून गेल्याने भात लावणी करणे अशक्य झाले आहे. यामुळे येथील ग्रामस्थ व शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला असुन याचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.     हवामानाच्या अंदाजानुसार या वर्षी पाऊस कमी पडेल असे बोलले जात असतांना एक महिना उशीरा पावसाने सुरुवात केली असली तरी यानंतर ५ ते ८ जुलै रोजी पडलेल्या तुफान पावसामुळे एका क्षणात होत्याचे नव्हतं करून सोडले असुन रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्य...