गोरेगाव दोशी वकील महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा 

          प्रतियोगिता परीक्षांच्या 500 ग्रंथ                   मासिकांचे प्रदर्शन  

 गोरेगाव (सृष्टी पवार) माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे दोशी वकील आर्ट्स कॉलेज अँड जी सी यु बी सायन्स अँड कॉमर्स कॉलेज गोरेगाव - रायगड येथे राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग आणि करिअर कट्टा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या विविध पुस्तकांची ओळख करून देण्यासाठी पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले होते.

 यामध्ये विविध प्रकाशनाची सुमारे 500 स्पर्धा परीक्षा पुस्तके मासिके, चालू घडामोडी इ. पुस्तके ठेवण्यात आली होती.  प्राचार्य डॉ. जनार्दन होटकर सर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन झाले. करियर कट्टा समन्वयक डॉ. सुभाष कदम आणि डॉ. गणेश सानप यांनी विद्यार्थ्यांना विविध पुस्तकांची माहिती करून दिली. ग्रंथपाल डॉक्टर गणेश सानप यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची पुस्तके ग्रंथालयातून घेऊन त्याचा अभ्यासासाठी पुरेपूर वापर करावा, असे आवाहन केले. स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा वापर फक्त प्रवेश घेतलेले विद्यार्थीच नाही तर यापूर्वी महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थीही करू शकतात, आणि त्याचा फायदा आजी-माजी विद्यार्थ्यांनी घ्यावा, असेही आवाहन त्यांनी  केले.

  स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख डॉ. अमोल साळवे आणि परीक्षा विभाग प्रमुख डॉ. श्रीकांत चांदोरकर यांचेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  करियर कट्टा संसदेच्या सर्व मंत्र्यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog