अभिनव विद्यामंदिर पारनाका कल्याण येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न 

कष्टाविना विना फळ नाही, कष्ट करा यशाचा अभिमान बाळगा,गर्व करू नका,माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा आदर्श बाळगा:- प्रा.नारायण फडके 

 कल्याण (प्रतिनिधी)नुकताच कल्याण येथील अभिनव विद्यामंदिर पारनाका येथे छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा 2026 च्या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभात संस्थेचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. नारायण फडके विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले "की कष्टाविना फळ नाही, कष्ट करा यशाचा अभिमान बाळगा, गर्व करू नका,माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा आदर्श बाळगा. असे प्रतिपादन प्रा.नारायण फडके यांनी केले ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणात बोलत होते.

 कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन   वंदे मातरम या गीताने झाली.यावेळी व्यासपीठावर छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणचे कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.नारायण फडके ,सरचिटणीस डॉ.निलेशजी रेवगडेतसेच प्रमुख अतिथी म्हणून  सुभाषजी पाटील  विज्ञान भारती,विवेकजी पुराणिक विद्याभारती,श्यामलाताई भट संस्कृत भारती, चिटणीस सारिकाताई कुलकर्णी,तसेच लंडन विद्यापीठात एल एल एम साठी नियुक्त झालेल्या आदिवासी समाजातील पहिल्या वकील अँडव्होकेट कु.सपना वाघमारे  अतिथी म्हूणन उपस्थित होत्या.

 एन ई पी च्या माध्यमातून  उपक्रमाचे मूल्यांकन करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणार:-डॉ.निलेशजी रेवगडे 

 छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेचे सरचिटणीस डॉ. निलेशजी रेवगडे म्हणाले एन ई पी च्या माध्यमातून शाळेत करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची मूल्यमापन करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याबाबत अनमोल मार्गदर्शन  करुन ते आपल्या भाषणात म्हणाली की "तुम्ही मिळवलेले गुण  हे तुमच्या शिस्तीचे संस्काराचे  वेळेचे, नियोजनाचे, मोठे स्वप्न बघण्याच्या धाडसाचे, आहे, दहावी बारावी शेवट नाही सुरुवात आहे स्पर्धा खूप मोठी आहे ज्ञानाबरोबर चारित्र्य माणुसकी जपा. असा विद्यार्थ्यांना सल्ला दिला  यावेळी सुभाषजी पाटील विज्ञान भारती,  विवेकजी पुराणिक विद्याभारती, श्यामलाताई भट संस्कृत भारती, यांनी विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले.

जी माणसं दुःख पित्तात, वेदना पितात तीच माणसं मोठी होतात. छत्रपती शिक्षण मंडळाचे कार्य दीपस्तंभा सारखे  :-अँड सपना वाघमारे 

 जी माणसं दुःख पितात वेदना पितात तीच माणसं मोठी होतात माणसाने दुःख वेदना प्यायला शिकले पाहिजे दुःख वेदनामुळेच माणसाला बळ येतं तुमच्या मनात जिद्द असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत मात करू शकता शिक्षण घेत असताना कोणत्याही प्रकारे दुःख वेदना वाटयाला आला तर परिस्थिती समोर डगमगू नका निर्धार कायम ठेवून दुःखाला सामोरे जा याच्यामध्येच यशाची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन लंडन विद्यापीठात एल एल एम  साठी नियुक्त झालेल्या आदिवासी समाजातील पहिल्या वकील व कार्यक्रमाच्या अतिथी अँडव्होकेट कु.सपना वाघमारे यांनी आवाहन केले यांनी छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण आयोजित माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा 2026 च्या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभात प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणात बोलत होत्या.

 त्या पुढे म्हणाल्या की छत्रपती शिक्षण मंडळाचे कार्य हे  दीपस्तंभासारखे तसेच  कौतुकास्पद असून" मागेल त्याला शिक्षण देऊन, शोषित वंचित आदिवासी घटकांना प्रवाहात आणण्याचे  पवित्र कार्य  छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण व सर्व पदाधिकारी करत आहेत याचा मला विशेष अभिमान आहे.

यावेळी छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेतील विविध शाळातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये एसएससी परीक्षेमध्ये संस्थेत  कु. गुंजल विश्राम महाजन प्रथम,नूतन विद्यामंदिर कल्याण ,द्वितीय श्रुती महेंद्र देऊसकर नूतन विद्यालय कर्णिक रोड,  कु.आराध्य संतोष गावडे द्वितीय माध्यमिक विद्यालय सानपाडा  

 कु.संस्कृती केतन ऐत तृतीय माध्यमिक विद्यामंदिर रातवड,कला विभाग प्रथम कू.आदिती साईनाथ भोईर  शारदा विद्यालय व कनिष्ठ विद्यालय,

 वाणिज्य विभाग प्रथम कु.पल्लवी वसंत अरोटे सानपाडा जुनिअर कॉलेज, कु.जतिन निवास भोईर विज्ञान विभाग प्रथम विक्रमगड महाविद्यालय 

 तसेच विभागात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला तसेच मार्च शालांत परीक्षेमध्ये   संस्थेत  प्रथम आलेल्या तसेच विद्यालयात प्रथम आलेल्या  व विषयामध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह तसेच पर्यावरण पूरक पिशव्या देऊन गौरव करण्यात आला.

विद्यालयाचा १००%  निकाल लागणाऱ्या विद्यालयातील मुख्याध्यापकांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये गंगा गोरजेश्वर विद्यामंदिर फळेगाव श्री राठोड सर , सह्याद्री विद्यालय नारिवली श्री निंबाळकर सर, श्री जयेश्वर विद्यामंदिर डेंगाची मेट, श्री मराड सर, माध्यमिक विद्यालय नांदकर सांगे श्री सोनावणे सर, माध्यमिक विद्यामंदिर रातवड श्री कदम सर,जय जवान जय किसान शाळा वाघेरी श्री भेदाटे सर, माध्यमिक विद्यालय  सानपाडा मराठी, श्री व्हावळ सर व माध्यमिक विद्यालय  सानपाडा इंग्रजी, सौ रावत मॅडम  या विद्यालयातील मुख्याध्यापकांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या संस्थेतील मुख्याध्यापक  श्री रमाकांत पाटील मनोगत व्यक्त करून उत्तम मार्गदर्शन  केले.

छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण कार्यकारणी सदस्य मिलिंदजी कुलकर्णी, माजी सरचिटणीस ठाकूर देसाई, किशोर आल्हाट,
अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संपत गीते सर,रमाकांत पाटील सर,
एनईपी समन्वयक उर्मिला जाधव मॅडम तसेच
संस्थेच्या 56 शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 


Comments

Popular posts from this blog