आपल्या कपाळावरचा गंध, मंदिरावरचा कळस, अंगणातील तुळस,घरातील माय,गोठ्यातील गाय, सुरक्षित ठेवायची असेल तर हिंदूंनी एकत्र येण्याची गरज:-हभप गौरीताई सांगळे
लव्ह जिहाद! आणि धर्मांतराबाबत वज्रमुठ आवळण्याचे आवाहन!
दहा हजाराचा मेकअप करा पण अंगभर कपडे घाला!
जिच्या अंगभर कपडे ती जगातली सुंदर स्त्री!
हभप गौरीताई सांगळे यांचा तरुणींना आवाहन!
कोलाड (विश्वास निकम) हिंदूंच्या रक्षणासाठी आपण संघटित होणे गरजेचे आहे.आपल्याला कपाळावरचा गंध, मंदिरावरचा कळस, अंगणातील तुळस, घरातील माय,गोठ्यातील गाय,सुरक्षित ठेवायचा असेल तर हिंदूंनी एकत्र येण्याची गरज आहे असे मत हभप गौरीताई सांगळे यांनी सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशीतील आयोजित विराट हिंदू संमेलनात आपले मत व्यक्त करतांना सांगितले
![]() |
नात्यांचा आदर कसा करायचा असतो?बहीण भावाचे नाते नाते म्हणजे काय?पती पत्नीचे नाते काय असते? सासू सासऱ्याच्या आदर कसा करायचा?माता पित्याचेवर नतमस्तक कसे व्हायचे हे फक्त हिंदू धर्म शिकवतो.आपण शिवरायांचे वारसदार म्हणून जन्माला आलो आहोत.या ठिकाणी आपण जन्माला आलो आहोत ही माती पवित्र आहे.आपण जगात कोठेही गेलो कि आपल्याला कोणी विचारले कि तुम्ही कोणत्या गावचे आहात यावर कोलाडच्या माणसाने गर्वाने सांगितले पाहिजे कि ज्या शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले.३२मनाचा सोनेरी सिंहासन ज्या रायगडावर महाराजांनी उभारले त्या मातीतील आम्ही माणसे आहोत.तसेच मुलींनी कोणते कपडे घातले पाहिजे.त्यांच्या मातांनी आपल्या मुलीला काय शिकवण दयावी.मुलींनी ' लव्ह जिहाद,ला बळी पडू नये.अशा अनेक महत्वाच्या आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच सौरभ करडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले मी हिंदू संमेलनसाठी अनेक जिल्हे फिरलो परंतु सर्व जिल्ह्यातील कोलाड मधील विराट हिंदू संमेलन सर्वात मोठे संमेलन पहायला मिळाले.कोलाड विभाग हा नामांकित,ऐतिहासिक,सामाजिक, धार्मिक,संस्कृतीक या सर्व पार्श्वभूमीवर लाभलेला कोलाड मला बोलावलेत हे माझे भाग्य आहे. या लावलेल्या फोटो मध्ये जी भारतमातेची प्रतिमा दिसते यामध्ये सर्व सिमा सुरक्षित दिसतात याला कारण रायगड जिल्ह्यातील पाचाड येथील जिजाऊ मातेची समाधी आहे यामुळे आपल्या सिमा सुरक्षित दिसतात. जगाच्या पाठीवर एकमेव देश आहे. या देशात एकमेव हिंदू परंपरा आहे येथे स्त्रीला पुजावया शिकवते.
संत नामदेव यांनी तीन वेळा भारत भ्रमन केले. ज्या ज्या ठिकाणी,ज्या ज्या प्रांतात गेले त्या ठिकाणी मठाची बांधणी केली. व हिंदू धर्माचा प्रसार केला.रायगड जिल्हा ही महाराष्ट्राची अयोध्या आहे.येथे लढाई आहे, झुंज आहे, हिंमत आहे, येथे पुनर्निर्मान आहे स्वराज्यांचा भगवा झेंडा दिसतो.भक्ती आणि शक्ती संगम येथे आहे हिंदू धर्माची ताकद शिवाजी महाराज यांनी अनुभवली आहे.
सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशीचे अध्यक्ष राजेश गांधी यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात सांगितले कि आजच्या काळात हिंदू समाजाने एकत्र येणे काळाची गरज आहे.जोपर्यंत आपण जातीपातीत विखूरलेलो आहोत तोपर्यंत आपण कंकुवत समजला जातो. जोपर्यंत सकाळ हिंदू म्हणून वज्रमूठ आवळून एकत्र येतो तेव्हा आपली ताकद काय आहे. हे कोलाड पंचक्रोशीने विराट गर्दीने दाखवून दिले आहे.आपल्या समोर लव्ह जिहाद, बेकायदेशीर धर्मांतर, व आपल्या देवस्थानावर होणारे आक्रमक थांबाण्यासाठी एकत्र येणे काळाची गरज आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोलाड परिसरातील वारकऱ्यांची दिंडी प्रदक्षिणा,व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रफूल्ल बेटकर तर सूत्रसंचालन प्रार्थना प्रसन्न बेटकर यांनी केले. कोलाड खांब परिसरातील असंख् हिंदू बांधव व महिला वर्ग उपस्थित होत्या .तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





Comments
Post a Comment