गुरूकडून ज्ञान वडीलांकडून संघर्ष आईकडून संस्कार शिकलो म्हणून 39 वर्षात निष्कलंक सेवा करू शकलो:-उपनिरीक्षक राम पवार
सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी
रायगड :-(ओम पवार) पोलीस खात्यामध्ये 39 वर्षे सेवा करताना खूप अडचणी आल्या मात्र मागे हटलो नाही गुरूकडून ज्ञान,वडिलांकडून संघर्ष व आई कडून मिळालेले संस्कार व पत्नीने दिलेली साथ या शिदोरीमुळेच पोलीस खात्यात 39 वर्षे निष्कलंकपणे सेवा करू शकलो असे प्रतिपादन सुधागड पाली पोलीस ठाण्याचे सेवानिवृत्त कार्यतत्व कर्तव्यदक्ष व लोकप्रिय सेवानिवृत्त उपनिरीक्षक राम मारुती पवार यांनी काढले ते सेवानिवृत्ती समारंभाच्या कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले की 39 वर्षात खूप काही शिकलो तुमच्या समाजाच्या सहकार्यामुळे 39 वर्षाच्या प्रवासात पुढे जाऊ शकलो आव्हानांशी सामना करण्याची प्रेरणा ही आपल्यासारख्या स्नेहांमुळेच मिळाली तुमचे सहकाऱ्यांचे, समाजाचे ऋण शब्दात मी व्यक्त करू शकत नाही. मी जरी सेवानिवृत्त झालो असले तरी यापुढे सुद्धा अखंड समाजाची सेवा करण्याची अभिवाचन सेवानिवृत्त व लोकप्रिय पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राम पवार यांनी दिले.
यावेळी त्यांचे चिरंजीव सरपंच दिनेश पवार यांनी आपल्या वडिलांनी कशा पद्धतीने प्रतिकृल परिस्थितीत शिक्षण घेऊन कशाप्रकारे अडचणी व मात केली हे आपल्या प्रास्ताविकेतून व्यक्त केले.
यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख मिलिंद दादा देशमुख, तिवरे ग्रामपंचायतचे माजी सरपंच मनोहर देशमुख,तिवरे ग्रामपंचायतचे सरपंच दिनेश पवार, दहिगाव ग्रामपंचायतचे सरपंच विष्णू वाघमारे तसेच आदिवासी संघटनेचे खालापूर अध्यक्ष मारुती पवार अजय देशमुख उपसरपंच तिवरे, गिरीश दळवी उपसरपंच ग्रामपंचायत जांभूळपाडा, शरद बोडके उपसरपंच माणगाव, रवींद्र आंदेकर उपसरपंच परळी, विजय देशमुख उपसरपंच मानकिवली, जितेंद्र दळवी माजी सरपंच तिवरे, मयूर देशमुख उपसरपंच तिवरे, श्रीमती अस्मिता बैकर सरपंच आपटवणे, जे. बी.गोळे सर, तळेकर सर, मेने सर, पार्वती विष्णू पवार ग्रामपंचायत सदस्य परळी,
चंद्रकांत वाघमारे आदिवासी समाज अध्यक्ष पाली, रमेश पवार सदस्य ग्रामपंचायत जांभूळपाडा, सामाजिक कार्यकर्ते विष्णू पवार परळी, सामाजिक कार्यकर्ते राजू देशमुख नवघर, दीपेश पवार, राजेंद्र पवार खालापूर दीपाली नाईक तसेच असंख्य राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच आदिवासी बांधव उपस्थित होते.
सदर उपनिरीक्षक राम पवार यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पेडली धोंडीवली फार्म हाऊस येथे संपन्न झाला.
Comments
Post a Comment