चिंचवली तर्फे दिवाळी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे खा.सुनिल तटकरे यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन!   

कोलाड (विश्वास निकम )  रोहा तालुक्यातील चिंचवली तर्फे दिवाळी पंचायतीमध्ये  मा. बाळासाहेब ठाकरेस्मुती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने अंतर्गत चिंचवली तर्फे दिवाळी ग्रामपंचायत कार्यालय बांधणे कामाचा भूमी पूजन सोहळा शनिवार दि १३ डिसेंबर रोजी रायगडचे कार्यसम्राट खा. सुनिल तटकरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.

     यावेळी युवा नेते राकेश शिंदे, रोहा तालुका महिला अध्यक्षा प्रितमताई पाटील, जेष्ठ नेते नारायण धनवी,रामचंद्र चितळकर, गडकिल्ले प्रेमी श्री शेलार,नरेंद्र जाधव, मनोज शिर्के, दर्शन तेलंगे,संजय मांडळुस्कर,राकेश कापसे,विजय कामथेकर,बंधू राजाराम येरुणकर,पांडुरंग भोनकर, चिंचवली अध्यक्ष बबन येरुणकर, उपाध्यक्ष राजेंद्र भिलारे, मारुती रामा मालुसरे,संतोष निकम, अजय निकम,प्रमोद तेलंगे, ग्रामसेवक शिंदे,ग्रामपंचायत सदस्य,प्राथमिक शिक्षक भोसले,तसेच हेटवणे,चिंचवली,बौद्धवाडी, आदिवासी बांधव तसेच परिसरातील असंख्य ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog