सुधागड तालुक्यातील घटना!
अवकाळीच्या पावसाच्या तडाख्यात राजिप शाळा झाप शाळेचे पत्रे उडून मोठे नुकसान
कोलाड (विश्वास निकम ) संपूर्ण रायगड जिल्ह्यात शनिवार दि.९ मे रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजरी लावली.यामुळे नागरिकांची मोठी तारांबल उडाली. या अवकाळीच्या तडाख्यात सुधागड तालुक्यातील झाप रायगड जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडाले असुन यामुळे शाळेचे मोठे नुकसान झाले आहे.
अचानक वादळ वाऱ्यासह तुफान पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे उमळून पडली. तर काही ठिकाणी घरांचे पत्रे व कौले उडाली यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे.यामुळे विज पुरवठा खंडित झाला.तसेच बाजापेठेतील व्यवसायिकांसह नागरिकांची तसेच अनेक ठिकाणी हळदी व लग्न समारंभातील नागरिकांची तारांबळ उडाली असल्याचे दिसून आले.
याबरोबर वीटभट्टी व्यावसायिक यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या अवकाळी पावसामुळे आंबा, काजु,फणस,या पिकांचे ही मोठे नुकसान झाले आहे. यामुळे प्रशासनकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे अहवान करण्यात आले आहे.तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांचे लवकरच लवकर पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.



Comments
Post a Comment