मुंबई गोवा महामार्गांवर टेम्पोने घेतला पेट,
कोलाडच्या खांब गावा नजिक घटना, स्थानिकांच्या सतर्कमुळे मोठा अनर्थ टळला!
कोलाड (विश्वास निकम ) मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरील खांब ग्रामपंचायती समोर ब्रिजवरुन गादी भरून जाणाऱ्या टेम्पोने अचानक पेट घेतला.असुन आजूबाजूच्या स्थानिक नागरिक यांनी धाव घेऊन प्रसंगवधान दाखवून आग आटोक्यात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला असुन कोणतेही जिवीत हानी झाली नाही.
सोमवार दि.२३ मार्च २०२६ रोजी दुपारी १२. ४५ सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरून खांब बाजुकडून कोलाड बाजूकडे गादी घेऊन जाणाऱ्या टेम्पो क्र. एम. एच ०४ के एफ १०५१ खांब ब्रिजवरून जात असतांना अचानक पेट घेतला. हे स्थानिक नागरिक व प्रवाशी वर्ग यांच्या लक्षात येताच त्यांनी घटना स्थळी धाव घेतली व प्रसंगवधान दाखवत आग आटोक्यात आणली व मोठा अनर्थ टळला.याची माहिती मिळताच रेक्यू टीम दाखल झाली परंतु तोपर्यंत स्थानिक नागरिक यांनी आग आटोक्यात आणली.


Comments
Post a Comment