खांब पंचक्रोशीचा ६९ वे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सभा चिल्हे येथे मोठ्या उत्साहात संपन्न
कोलाड (श्याम लोखंडे) कोकणात तसेच रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यातील श्री संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशीची वारकरी संप्रदायाची वैभवशाली परंपरा लाभलेल्या या पंचक्रोशीतील यजमान श्री क्षेत्र चिल्हे येथे ९ मार्च ते १६ मार्च या कालावधीत गेली सात दिवस मोठ्या उत्साहात ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण, श्री संत तुकाराम महाराज गाथा भजन सोहळा तसेच जय जय राम कृष्ण हरीजागर मंत्र जप कीर्तन महोत्सव असे धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रम चिल्हे येथे मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सदरच्या अखंड हरिनाम सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आणि प्रवचनकार यांचे अलौकिक मार्गदर्शनातून मंत्रमुग्ध होऊन याचा भक्तिमय वातावरणात पंचक्रोशीसह उपस्थित सांप्रदायिक भक्तगणांनी श्रवण करत त्याचा आनंद लुटला.तर भक्तभावनेने संपन्न झालेल्या या अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने याची सांगता सभा यजमान चिल्हे येथे शनिवारी २८ मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडली.
श्री संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशीचा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या निमित्ताने चिल्हे येथे शनिवारी रात्री ९ वाजता खांब पंचक्रोशीचे अध्यक्ष कृष्णा बाबा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पंचक्रोशीचे वैभव अधिष्ठान विद्या वाचस्पती डॉ. मारुती महाराज कोलाटकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच श्री संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशीचे उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली.यावेळी मदन महाराज कोलाटकर, भूषण महाराज वरखले, सेक्रेटरी सहदेव महाडिक,खजिनदार रविंद्र मरवडे, जेष्ठ सल्लागार रामचंद्र चितळकर, कृष्णकांत धनवी, नथुराम जाधव, जाधव रावसाहेब, किशोर जाधव, गणपत खामकर, रघुनाथ कोस्तेकर, महादेव माहित, राम लोखंडे, राम शास्त्री नागावकर, नीलेश कचरे, गणपत शिंदे, नंदकुमार मरवडे, अरविंद भिलारे, साहिल टवळे, मृदुंगमनी प्रेम, ज्ञानेश कोलाटकर, सह पंचक्रोशी पंच कमिटी तसेच खांब,नडवली, तळवली, धानकान्हे आधी यजमान चिल्हे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर सदरच्या आयोजित करण्यात आलेल्या सभेत ६९ वे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात भव्य दिव्य स्वरूपात पार पडले या सांगता समारोप प्रसंगी यजमान चिल्हे ग्रामस्थ महिला युवक युवतींचे रामचंद्र चितळकर, कृष्णकांत धनवी, किशोर जाधव, रविंद्र मरवडे, महादेव माहित, मदन महाराज कोलाटकर,भूषण महाराज वरखले, निवृत्ती लोखंडे, मार्गदर्शक तथा सभेचे अध्यक्ष डॉ मारुती महाराज कोलाटकर सह अनेक पंचक्रोशीतील उपस्थितांनी सप्ताह प्रसंगी श्री संत ज्ञानेश्वरी ग्रंथराज सामुदायिक पारायणास बसलेले २२१ वाचक,प्रवचनकार,कीर्तनकार,यांचे मौलिक विवेचन लाभले तसेच यजमान चिल्हे ग्रामस्थ यांनी या प्रसंगी घेतली मेहनत त्याबद्दल मनोगत व्यक्त करत भरभरून कौतुक करत सभा मोठ्या उत्साहात पार पाडली. तर सभेची सांगता शेवटी पसायदान आणि गोड प्रसाद देऊन करण्यात आली शेवटी यजमान चिल्हे ग्रामस्थ प्रमोद शिंदे यांनी पंचक्रोशीतील उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले.

Comments
Post a Comment