गौतम बुद्ध जयंती निमित्ताने भिमज्योत मित्र गोवे येथे विविध कार्यक्रम,युद्ध नको बुद्ध हवा, कॅन्डल मार्च काढून दिला शांततेचा संदेश!
कोलाड (विश्वास निकम) रोहा तालुक्यातील भिमज्योत मित्रमंडळ गोवे यांच्या तर्फे सोमवार दि.१२ मे २०२५ रोजी बुद्ध जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या निमित्ताने सकाळी ध्वजारोहन,पुजापाठ, दुपारी महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम,यानंतर भिमज्योत मित्र मंडळ बौद्ध वाडी ते शिव स्मारक पर्यंत कॅन्डल मार्च काढून युद्ध नको बुद्ध हवा,असा शांततेचा संदेश जगाला दिला.यानंतर भीमज्योत नगर गोवे येथील कपिलवास्तु बुद्ध विहार येथे गौतम बुद्ध जयंती उत्सवाच्या निमित्ताने मान्यवरांची भाषणे झाली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, उपाध्यक्ष रामजी गायकवाड, सचिव अनिल गायकवाड, कार्याध्यक्ष रुपेश गायकवाड, तसेच सर्व सदस्य, जेष्ठ नागरिक गोविंद गायकवाड, मनोहर गायकवाड,मिलिंद गायकवाड,अशोक गायकवाड, उपस्थित होते सर्व कार्यक्रम यशस्विकरण्यासाठी महिला अध्यक्षा रुपाली रुपेश गायकवाड, उपाध्यक्षा रुपाली रामजी गायकवाड, सचिव नूतन गायकवाड,खजिनदार स्वाती गायकवाड,सल्लगार प्रतिमा नयन गायकवाड, तसेच सर्व महिला वर्ग यांनी मेहनत घेतली.
Comments
Post a Comment