रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील घटना!

 अवेळी पडणाऱ्या पावसात वीज पडून १४ वर्षीय  वेदांतचा दुर्दैवी  मृत्यू 

 वेदांत नुकताच आठवी पास झाला होता!

तळा (प्रतिनिधी )रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील कर्नाळा येथे शनिवारी ९ मे रोजी दुपारी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान वीज अंगावर पडून वेदांत जनार्दन भोसले या अवघ्या १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. 

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून कर्नाळा ग्रामस्थांकडून तसेच पंचक्रोशी मधून  हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वेदांत हा अवकाळी पावसामुळे वाड्याजवळ गुरांना ठेवलेली पेंढे झाकण्यासाठी गेला होता. पेंढे झाकून झाल्यावर  वेदांतवर विज कोसळली  त्यात वेदांत गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्याला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली असून भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वेदांत हा अभ्यासात हुशार व शांत स्वभावाचा असून तो नुकताच आठवी पास झाला होता असे शिक्षक आणि ग्रामस्थांनी सांगितले. 

स्थानिक नागरिकांनी मृत मुलाच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या मृत्यूंसाठी शासनाकडून मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.या घटनेनंतर तळा तहसीलदार स्वाती पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित दुर्घटनेचा आढावा घेऊन पंचनामा केला.त्याचप्रमाणे विविध राजकीय पदाधिकाऱ्यांनी कुटुंबीयांची भेट घेत शोक व्यक्त केला.

 हवामान पूर्व सूचना यंत्रणा अधिक प्रभावी करण्याची गरज:

तळा तालुका हा समुद्रसपाटीपासून जवळच असणारा खाडीलगत असणारा तालुका आहे परिसरात वीज आणि हवामानाबाबत पूर्वसूचना यंत्रणा अधिक प्रभावी करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. ग्रामीण भागात सुरक्षित निवारा केंद्रे व आपत्कालीन यंत्रणा मजबूत करण्याची मागणीही यावेळी तालुक्यातील नागरिकांकडून  करण्यात आली  करण्यात आली.

वेदांतच्या जाण्याने त्याच्या आई-वडिलांची स्वप्नं तुटली आहेत. मित्रांनी एक जिवलग साथीदार गमावला आहे. शाळेने एक विद्यार्थी गमावला आहे. आणि समाजाने भविष्यातला एक सक्षम नागरिक गमावला आहे. या घटनेबाबत संपूर्ण तळा तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे.

Comments

Popular posts from this blog