अद्भुत दैवी शक्ती श्री क्षेत्र भातसई येथे महादेवीचे भगत गळ लाऊन आरूढ, हर हर महादेवाचे गजर,

 भक्तांच्या उपस्थितीत गळाचा सोहळा,

अनेकांच्या नयनांनी टिपला क्षण!

कोलाड ( श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील हाकेला धावणारी व नवसाला पावणारी आदर्शगाव भातसई गावची स्वयंभू श्री महादाई महादेवी मातेचा पालखी व यात्रा उत्सव सोहळा मंगळवारी ३१ मार्च व बुधवारी १ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी उत्सवाच्या आदल्या दिवशी मंगळवारी दुपारी १२ वाजता देवीची पालखी मिरवणुक सोहळा गावहद्दीतील गावागावात सुरू करण्यात आला तर भातसई गावातुन येशीच्या मंदिरातुन सुरुवात केली तद्नंतर पालखी झोलांबे, कोपरे या गावात गेली.त्यानंतर पालखी झोलांबे गाव ,लक्ष्मीनगर येथे फिरवून रात्री ७ वाजता आदर्शगाव  भातसई गावात घरोघरी भक्तीमय वातावर्नात ग्रामस्थ नागरीकांना दर्शन देत फिरून महादेवी मंदिरात आली.तर दुस-या दिवशी बुधवारी १ एप्रिल रोजी महादेवी मातेचा यात्राउत्सवाला सुरुवात होताच सकाळ पासुनच भक्तगण नवस घेऊन मंदिरात वाजत गाजत येत होते. सर्व रायगड जिल्ह्यातील व बाहेरून जिल्ह्यातील भक्तांचे जनसागर महादेवी आईच्या यात्रेमध्ये देवीच्या दर्शनासाठी आणि सोहळा पाहण्यासाठी सहभागी झालेचे यात्रेत दिसून आले.

येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान दैवत महादाई देवीचा पालखी आणि यात्रोत्सव मोठ्या भक्तीने चैत्र शुद्ध पौर्णिमा या दिवशी सुरू करण्यात आला.तर अद्भुत दैवी शक्ती भातसई नगरी दुमदुमली आणि हर हर महादेवाचे, महादेवी मातेचा,धाविर महाराज की जय चा गजर करत खालु बाजा सनईची धून देव काठ्या नाचवत सारे  या सोहळ्यात मंत्रमुग्ध होत नगरी दुमदुमुन गेली होती.मात्र यावेळी मुख्य कार्यक्रम गळ लावणे याकडे हजारोंच्या संख्येने आलेल्या भक्तगण यात्रेकरू यांच्या नजरा लागल्या होत्या त्या गळ लावणे या मुख्य कार्यक्रमाकडे भक्तांची अलोट गर्दी आणि तो क्षण टिपण्यासाठी उसळली होती.

यावर्षीचा गळ लावण्याचा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी ठिक ५:००  वाजता देवीचे भगत चिंतामणी खरिवाले यांच्या अंगात वारा संचारले तद्नंतर पालखी मंदिरात परतली भगत चिंतामणी खरीवले यांनी देवी जवळ जाऊन प्रथम दर्शन घेतले नंतर तेथेच वसलेले श्री धाविर महाराज यांचे दर्शन घेत गळा भेट घेऊन दैव शक्तीने भक्तांना गल टोचले व नंतर काही क्षणातच लाटेवर आरूढ झाले. हर हर महादेवाचा आणि महादेविचा गजर झाला. भक्त गणाच्या डोळ्याचे पारणे फिरवला जाणारा हा दैवी सुख सोहळा मुख्य गळ असलेले महादेवीचे भक्त भगवान शेळके (झोळांबे ) यांना मुख्य गळ लावण्यात आले. लाटेवर अधांतरी गळ लाऊन हर हर महादेवचा गजर होताच अधांतरी फिरवण्यात आले.या भाविकाला अधांतरीत दोरखंड लाटेला बांधलेल्या स्थितीत अधांरीत दैवी शक्तीच्या बळावर प्रदक्षिणा घालून फिरविण्यात आले. हा क्षण हजारो भाविक भक्तांच्या तसेच असंख्ये श्रद्धाळूंच्या नयनांनी भक्तीमय वातावरणात टिपला.महादेवी मातेचा जयघोष आणि गजर करत उपस्थीत भक्तगणांना याप्रसंगी क्षणोक्षणी दर्शन घडले.

भक्तीचा ओघ भक्तीचा महापूर अद्भुत दैवी शक्ती उसळलेल्या देवीच्या दर्शनासाठी भाविकांची तसेच यात्रेकरूंची अलोट गर्दी भाविकांची ओढ असलेल्या यात्रेतील ती वेळ अखेर येताच तरुणांसह अबालवृद्ध असंख्ये महिला भाविक भक्तगण महादेवी मंदिर परीसरात जमले होते. सायंकाळी सुर्य मावळतीला असताना हजारो भक्तांचे लक्षवेधी गळ या धार्मिक कार्यक्रमाकडे लक्ष लागले होते. आबालवृद्धासह ग्रामस्थ व हजारो भाविकांचे नजरा गळ लागण्याच्या ठिकाणी म्हणजे त्या स्थळाकडे होते. सर्व भक्तांची उत्सुकता दर्शनासाठी व पाहण्यासाठी शिगेला पोहचली होती. अखेर गळ लागलेले भाविक स्थळाकडे  आले. हजारोंच्या नजरा खिळल्या आणि सायं.६:१५ च्या सुमारास अंगात संचारलेले भगत चिंतामणी खरीवले लाटेवर आरूढ झाले. हर हर महादेवाचा गजर झाला. मुख्य गळ लावलेल्या भगवान शेळके या भाविकाला अधांतरीत दोरखंड लाटेला बांधलेल्या स्थितीत अधांरीत फिरविण्यात आले. हा क्षण हजारो नयनांनी भक्तीमय वातावरणात टिपला. 

येथील देवीचा चैत्र पौर्णिमा महाउत्सव आणि परंपरेने चालत आलेला ब्रिटिश काळापासून गळ टोचून नवस फेडण्याची वैभवशाली परंपरा महादेवीचा पालखी सोहळा तसेच गळ लावण्याची परंपरा आजही अखंडपणे चालू असल्याने हजारो भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी उसळलेली होती.यावेळी मुख्य वरचा गळ भगवान शेळके (झोळांबे) यावेळी त्यांच्या सोबत खालचा गल यशवंत जोशी (भातसई), सुदाम कोतवाल (भातसई), सदानंद  वाघवले (भातसई), सुभाष इंगवले (दमखाडी रोहा), शैलेश चोरगे (बेनसे) या भाविकांना गळ लावण्यात आले होते.

यावेळी निडी, पाला दरोडा, लक्ष्मीनगर, झोंळाबेसह मेढा व भातसई पंचक्रोशी तसेच दशकोतील व रोहा ,रायगड जिल्हयातील,ठाणे, मुंबई,पुणे,येथील त्याच बरोबर माहेर वाशिनी महादेवीच्या व श्री धाविर महाराज यांच्या यात्रेसाठी व दर्शनासाठी मंगळवार पासून जमले होते तर यात्रेसाठी बुधवारी दुपारनंतर ४ वाजल्यापासून मंदीराकडे मानाच्या सजविलेल्या देव काठ्यांचे आगमन झाले. पालखी मंदिरात आणण्यात आली. सांयकाळी ५ वाजल्यापासूनच मंदिरात धार्मिक विधीला सुरुवात झाली. देवीची पालखी मंदिरात येताच आरती नंतर गळ टोचणे या कार्यक्रमास खालुबाजा वाद्य वृंदावर सुरु झाली. गळ टोचल्यानंतर हर हर महादेव गजर करीत २० फुटी बैठक असलेल्या ठिकाणी गळ टोचलेले भाविक आले. एकुण मुख्य भाविकासह सहा भाविक लाटासह २५ फुटी असलेल्या ठिकाणी मुख्य गळटोचलेल्या भाविकांना आणण्यात आले. सायंकाळी ५:३० वा.सुमारास मुख्य गळाच्या धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. ६:१५ च्या सुमारास अंगात संचारलेले भगत चिंतामणी खरीवले लाटेवर आरूढ झाले. या ठिकाणी लाटेला अंधारीत मुख्य वरचा गळ असलेला भाविक भगवान शेळके यांना दोरखंडच्या सहाय्याने हर हर महादेवाच्या तसेच महादेवीचा मोठ्या भक्तीमय वातावरणात जयघोष करत फिरविण्यात आले.

तद्नंतर दोरखंडाच्या साह्यात असलेले भक्त प्रथम लाटेवरून उतरतात तद्नंतर भगत उतरतात वरती लाटेला प्रदीक्षणा करून दोरीच्या साह्याने खाली उतरून पुन्हा प्रदक्षिणा घालून मग मंदिरात जाऊन देवीला भेटतात नंतर पुन्हा भक्तांना टोचलेले गल देवीचा गजर जयघोष करत काढण्यात येतात 

रायगड जिल्ह्यातील सर्वात अद्भुत दैवी शक्ती असे मोठी यात्रा म्हणून या यात्रेस ओळखले जाते. तर बुधवारी १ एप्रिल रोजी हा भव्य दिव्य यात्रा सोहळा पार पडला यावेळी मानाच्या आलेल्या देवकाठ्या नाचवत हजारो भक्तगणांनी दर्शनाचा लाभ घेत यात्रेचा आनंद लुटला.या सोहळ्यास भातसई, पंचक्रोशी व दशक्रोशितील, रोहा, मुंबई, पुणे या प्रमुख शहरासह महाराष्ट्रातील व रायगड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भक्तगण येतात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात भातसई यात्रा साजरी करण्यात आली असून हा उत्सव यशस्वी करण्यासाठी भातसई ग्रामस्थासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ व भाविकांनी अथक परिश्रम घेतले.

Comments