ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मोबाईल साक्षरता' प्रशिक्षण संपन्न; आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे,इंटरनॅशनल लोंजेव्हिटी सेंटर इंडियाचा उपक्रम.

कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुका तसेच खांब विभागातील ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या ज्येष्ठ नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाचीओळख व्हावी आणि त्यांना डिजिटल युगात सक्षम करावे, या उद्देशाने ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था आणि आयएलसीआय (इंटरनॅशनल लोंजेव्हिटी सेंटर इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक ग्रुप ग्रामपंचायत कार्याल खांबच्या सभागृहात 'मोबाईल साक्षरता प्रशिक्षण' आयोजित करण्यात आले होते. याला येथील ज्येष्ठ नागरिकांना मोठा उत्सुर्त प्रतिसाद दिला.

या महत्त्वाच्या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन सुप्रसिद्ध मार्गदर्शक सुशांत सोनावणे आणि नंदकुमार सकट यांनी केले. त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत आणि प्रात्यक्षिकांसह ज्येष्ठ नागरिकांना मोबाईलच्या विविध फिचर्सची माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने व्हॉट्सअॅपचा वापर, सुरक्षित डिजिटल व्यवहार, ऑनलाइन सुरक्षितता आणि उपयुक्त अॅप्स कसे वापरावेत, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमाला गावांतील ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, एकूण ३५ ज्येष्ठ नागरिकांनी या प्रशिक्षणात उत्साहाने सहभाग नोंदवला. स्वतःच्या हाताने मोबाईल हाताळताना ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.

अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे ज्येष्ठ नागरिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जगाशी जोडले जाऊन स्वावलंबी होतील, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला. या यशस्वी उपक्रमाबद्दल ग्रामस्थांकडून ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था आणि आयएलसीआय यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog