रायगड जिल्ह्यातील घटना!
रोहा तालुक्यात पहूर वाळंजवाडी गोमाशी डोंगरावर गड संवर्धन मोहिमेतून सापडले ऐतिहासिक अवशेष,
दोन वर्षाच्या भटकंती व शोध मोहिमेतून ऐतिहासिक ठेव्याचा उलगडा!
तालुक्यात पाचवा किल्ला म्हणून याची नोंद घ्यावी, शिवप्रेमींची मागणी!
न्यूज आज तक मराठीची टीम गोमाशी डोंगरावर दाखल!
![]() |
| छायाचित्र:- ओम पवार रायगड |
रोहा :-(श्याम लोखंडे) शिव छत्रपतींच्या रायगडच्या राजधानीत तसेच रोहा तालुक्यातील वाळंजवाडी पहूर येथील पूर्वीच्या काळातील ओळखला जाणारा तसेच केदार जननी मातेच्या पहाडी कड्यालागत असलेल्या गोमाशी डोंगरावर गड संवर्धन मोहिमेतून गड संवर्धन करणाऱ्या शिवप्रेमीना सापडल्या शिवकालीन ऐतिहासिक सापडले अवशेष त्यामुळे येथे पूर्वीचा ऐतिहासिक गड किल्लाच असल्याचे म्हटले जात आहे तर येथे हे शिवप्रेमी मागील दोन वर्ष या डोंगर परीसरात भटकंती आणि संवर्धन मोहिमेतून काम करतात या माध्यमातून या ठिकाणी त्यांना वरती काही ठिकाणी पाण्याचे टाकं तसेच गडाला असल्यासारखे तटबंदी जोथे ऐतिहासिक चिरे, कौलांचे आणि मातीच्या मडक्यांचे तसेच माती विटांचे अवशेष सापडले आहेत त्यामुळे या ऐतिहासिक डोंगराला ऐतिहासिक गडाचा दर्जा मिळावा अशी मागणी शिव प्रेमींच्या माध्यमातून पुरातत्व खाते आणि रायगड प्राधिकरण विभाकडे केली जात आहे.
छत्रपती शिवरायांच्या रायगडच्या राजधानीवर तसेच रोहा तालुक्यामध्ये अवचित गड घोसाळेगड सुरगड आणि बिरवाडी( भवानी गड) गड असे चार किल्ल्यांची नोंद आहे, पण सह्याद्री मधले भटके आणि रायगड टूर गाईडचे सदस्य आनंद सोनाराम सानप,किशोर सावरकर ,कृष्णाराम जाधव ,केतन फुलपगारे,सौरभ घरट , दत्तात्रेय सावंत काका यांनी रोहा तालुक्यात इतिहासाच्या आणि काळाच्या ओघात लुप्त झालेले गडकोट किल्ले संवर्धन आणि त्याच्या संरक्षण मोहिमेच्या भटकंतीतून डोगर कड्यातून ऐतिहासिक ठेवेचा शोध घेत गेली अनेक वर्ष बा रायगड आणि दुर्ग गड संस्था यांच्या माध्यमातून तसेच शिवप्रेमी म्हणून हे ऐतिहासिक कार्य करत आहेत.
![]() |
| छायाचित्र:- ओम पवार रायगड |
याच अनुषंगाने तालुक्यातील पहूर वाळंजवाडी आणि सभोवतालचा प्रदेश हा ऐतिहासिक शिल्प वीरगळ सतिशीला यांनी समृद्ध आहे आणि त्याचेच संदर्भ घेऊन रायगड टूर गाईड सर्विस चे सर्वे सर्वा आनंद सानप यांनी भोवतालच्या परिसरात शोध मोहिमा आणि अभ्यास मोहिमांना सुरुवात केली त्यांनी त्याची ही संकल्पना त्यांचे सह्य सवंगडी कृष्णराम जाधव,किशोर सावरकर, सौरभ घरट , दत्तात्रेय सावंत काका, यांना दिली आणि इथून पुढच्या शोध मोहिमांना सहकार्य करण्याचे सहमती अधिक दर्शवली आणि त्याचे सार्थक झाले.शोध मोहीम दरम्यान वाळंजवाडी हद्दीत असणाऱ्या आणि पहूर कडील बाजूला असणाऱ्या एका डोंगरावर त्यांना किल्ल्याचे असणारे काही अवशेष आढळून आले. डोंगरावर आठ पाण्याचे टाक , कौलाची खापरे मटक्याची खापरे , तटबंदी दगडाचे चीरे , विटांचे अवशेष असे काही भरपूर सारे काही ऐतिहासिक काळातील अवशेष मिळाले आहेत.त्या अनुषंगाने लवकरच रोहा तालुक्यामध्ये चार गड किल्यांसोबतच या पाचव्या किल्ल्याची इतिहासात नोंद करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. तर वाळंजवाडी गावच्या हद्दीमध्ये असणारा आणि पहूर गावच्या वाटेवर असणारा हा डोंगर याला पूर्वीचे काळात गोमाशीचे डोंगर असे नाव होते परंतु इथून पुढे हा देखील एक किल्ला आहे अशी नोंद शासन दरबारी केली जाईल अशी मागणी होत असून रायगड टूर गाईड च्या सदस्यांनी आतापर्यंत गेली दीड दोन वर्षभरात वेगवेगळ्या दिवशी शोध मोहिमा घेतल्या आणि या शोध मोहिमांमध्ये त्यांना पाण्याचे टाक मातीच्या मटक्याची खापरे चिरेबंदी जोथ्याचे अवशेष तसेच तटबंदीचे अवशेष असे भरपूर सारे ऐतिहासिक अवशेष मिळाले त्यावरून हा डोंगर नाही तर एक ऐतिहासिक किल्लाच आहे असा निश्चित निष्कर्ष या ठिकाणी पहावयास मिळत आहे.
![]() |
| छायाचित्र:- ओम पवार रायगड |
वर डोंगर माथ्यावरून नजरेतून समोर सुरगड,घनगड, तैलबैला,सुधागड, कुर्डू, कोकण दिवा, अवचित गड, केदार जननी डोंगर, कुंडलिकेचा खोरे, सह्याद्री पर्वयाची भली मोठी रांग, भिरा टाटा पॉवर जणींचा डोंगर आणि त्याचा भुयार तसेच पाण्याचं टाक असे इतिहासाचे साक्ष देऊन जात आहे. तसेच वर वन प्राणी यांची देखील पाऊल खुणा आणि त्यांची वहिवाट जाणवत आहेत वेगवेगळे चिरे आणि काही तटबंदी चिरे पाण्याचे टाकं आणि त्याला कडेला त्याकालीन पोळ होल अच्छा दान म्हणजे पाण्याच्या टाकीवरती सावली क्षेत्र असे काही ठिकाणी साक्ष देत आहेत.तसेच पायथ्याशी देखील काही शिवकालीन कडे हे साक्ष देत असल्याचे निदर्शनास दिसून येत आहेत. सदर बातमी समजताच सदर घटनेची सत्यता पडताळून पाहण्यासाठी न्युज आज तक मराठी टीमने सदरील गोमाशी डोंगराला भेट दिली.
![]() |
| (छायाचित्र :-ओम पवार- रायगड) |
प्रतिक्रिया:- अनेक वर्षे गड संवर्धनाचे कार्य करत असताना या परिसरात सत्यशील विरगळ आढळून येत असल्याने गेली दोन वर्षे सातत्याने या डोंगरावर एक ऐतिहासिक शिवकालीन दुर्ग गड असावे ही भावना मनात ठेवून आम्ही वर चढून या ठिकाणी शोध मोहीम आणि काम करत आहोत अनेकदा वेळ अभावी माघारी गेलो मात्र एकच ध्यास घेऊन पुन्हा प्रयत्न मी आणि माझे सवंगडी रस्ता करून ही मोहीम आजतागायत राबवत असताना या ठिकाणी संवर्धन करत असतांना ऐतिहासिक शिवकालीन अवशेष त्यामध्ये पाण्याचे टाकं,तटबंदी असलेले कठडे, शिवकालीन चिरे,कौलांचे, मडक्यांची खापर, विटांचे अवशेष असे सापडत आहेत त्यामुळे याला तालुक्यातील चार गडकिल्यांप्रमाणे गडकिल्याचा दर्जा मिळावा तसेच त्याची नोंद व्हावी या उद्देशाने इतिहास अभ्यासक यशवंत पुत्र मोहन फराटे हे पाहणी करणार असून तद्नंतर ऐतिहासिक किल्ला म्हणून याची पुरातत्व खात्याने आणि रायगड प्राधिकरण विभाकडे याला गड किल्ला म्हणून ओळखला जावा अशी मागणी करण्यात येणार असल्याचे गड संवर्धन मोहिमेतून शिव प्रेमी तथा आनंद सोनाराम सानप रायगड टूर गाईड सर्विस प्रो.प्रा.दुर्ग संवर्धक पोलिस पाटील कामथ रोहा रायगड यांनी सांगितले.
प्रतिक्रिया:-महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड किल्ल्यांचे जतन संवर्धन करणाऱ्या गडप्रेमी शिवप्रेमी व संस्था यांना शासकीय निधीची तरतूद करावी तसेच
छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणा तसेच इतिहासाची ओळख पुढच्या पिढीला निर्माण व्हावी तसेच पडक्या वस्तू दुरुस्त करणे, किल्ल्यांचे पावित्र्य राखणे यासारखे उपक्रम काही सामाजिक संस्था उपक्रम राबवत असतात त्यामध्ये अनेक दुर्गा प्रेमी शिवप्रेमी संस्था युवक असतात तसेच अनेक पिढी गड संवर्धन मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग घेऊन इतिहासाचे जतन करण्याचे पवित्र कार्य करत असतात तसेच अनेक किल्ल्यांच्या शोधात असतात या तरुणांना गड किल्ल्यांचे संवर्धन जतन या गोष्टींना शासकीय निधी देण्याची शासनाने तरतूद करण्याची मागणी रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटना जिल्हाध्यक्ष भिवा पवार यांनी व्यक्त केले.
गड किल्ले संवर्धन करण्यासाठी शिवप्रेमी संस्था आणि उपक्रमांमध्ये सहभागी होतात शासनाने या गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी काही खोदकाम, शोधक किल्ल्यांचे शोध, स्वच्छता करण्यासाठी लागणारे साहित्य यांना शासनाने निधी उपलब्ध केली तर यामध्ये काम करणाऱ्या संस्था गडप्रेमी यांची संख्या वाढेल व गड किल्ल्यांची आणि ऐतिहासिक वस्तू संवर्धनातून महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारशाचे जतन होईल आणि याच वास्तूंच्या सहकार्याने पर्यटनाला चालना मिळेल असे मत भिवा पवार यांनी पत्रकारांची व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तसेच पूर्वीचा काळी व्यापार करणारे व्यापार व्यावसायिक कोलाड कुर्डू मानगड लिंग्या आणि भोर घाट कडे जाणारा मार्ग त्यामुळे ऐतिहासिक काळात याचा टेहळणीसाठी वापरत केला जात असावा असे देखील तर्क वितर्क व्यक्त होत आहेत.त्यामुळे या डोंगरावर साक्ष देणारे काही ऐतिहासिक शिवकालीन अवशेष या दुर्ग गड संवर्धन करणाऱ्या शिवप्रेमीना सापडल्या आहेत.
त्यामुळे रोहा तालुक्यात इतिहासात नवा अध्याय जोडला जाणार का…?पहूर–वाळंजवाडी येथील गोमाशी डोंगरावर गड संवर्धन मोहिमेदरम्यान शिवकालीन पाण्याचे टाकं, तटबंदी, चिरे, कौल आणि विटांचे अवशेष सापडले आहेत.
शिवप्रेमी आणि रायगड टूर गाईडच्या शोध मोहिमेतून हा डोंगर फक्त डोंगर नसून एक ऐतिहासिक किल्लाच असल्याचा दावा करण्यात येतोय.सध्या रोहा तालुक्यातव चितगड,सुरगड, अवचित गड यांसह चार किल्ले नोंदणीकृत त्यात आता गोमाशी डोंगराला पाचव्या किल्ल्याचा दर्जा द्यावा,अशी जोरदार मागणी शिवप्रेमींकडून होत असल्याने पुरातत्त्व विभाग काय निर्णय घेतो…? याकडे संपूर्ण रोहा तालुक्याचे लक्ष लागले आहे.






Comments
Post a Comment