बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचारा विरुद्ध सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशी तर्फे पोलीस स्टेशनला दिले निवेदन 

  कोलाड: (विश्वास निकम ) बांगलादेशात हिंदू समाजावर होणारे अत्याचार, हिंदूंची घरे-दुकाने जालने दिपु चंद्रदास या हिंदू तरुणाची कट्टरनक्षलवाद्यांनी केलेली निर्घृण हत्या या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज कोलाड मार्फत कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांना या घटना रोखण्यासाठी राजकीय हस्तक्षेप व आंतरराष्ट्रीय दबाव टाकण्यात यावा अशी मागणी करण्यासाठी निवेदन देण्यात आले.

  बांगलादेशात सातत्याने होणारा हिंदूविरोधी हिंसाचार थांबविण्यासाठी भारत सरकारने आता ठोस पावले उचलणे गरजेचे असुन सरकाने त्वरित अंमलबजावणी करावी. बांगलादेशावर तात्काळ आर्थिक,व्यापारीक व राजनैतिक निर्बंध घालावे. बांगलादेशामधील कट्टरतावादी गटांविरुद्ध कठोर आंतरराष्ट्रीय कार्यवाई करण्यात यावी अशी आग्रहाची मागणी सकल हिंद समाजाची आहे. भारताने जागतिक स्तरावर दबाव आणुन बांगलादेशातील  हिंदूंचे रक्षण करावे.बांगलादेशात सातत्याने होणारा हिंदुविरोधी हिंसाचार थांबविण्यासाठी भारत सरकारने आता ठोस पावले उचलणे गरजेचे आहे असे आंबेवाडी नाका येथे कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांना दिलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे.

       यावेळी आंबेवाडी नाका येथे रायगड भुषण हभप मारुती महाराज यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले कि कळत न कळत का होईना? आपल्या दृष्टीने अतिशय भयंकर गोष्ट आहे. खरं तर आपल्या कुटुंबातील एक तरुण त्या ठिकाणी गेला हे मानता आपल्या अंगावरील अर्थात आपल्या हातावरील एक बोट तुटले असे बोलणे हरकत नाही. वास्तविक पाहता या हिंदुत्वावर आघात होणे म्हणजे आपल्या हिंदू देशावर संकट म्हणावे लागेल यासाठी आपण सर्वांनी सक्षम होणे गरजेचे आहे यासाठी हिंदू आहोत याची जाणीव होण्यासाठी आपल्या जवळ प्रमुख्याने उद्या. शेंडी असणे, वस्र अलंकार, वेश भुषा केश भुषा कपाळावर गंध यावरून आपण हिंदू आहोत हे आपल्याला कळतो. यासाठी आपण एकत्र येऊन आपल्यावर होणाऱ्या अन्याया विरुद्ध लढले पाहिजे यावेळी सकल हिंदू समाजाचे भरत सातांबेकर यांनी ही एकत्र येऊन प्रश्न सोडविले पाहिजे असे सांगितले यावेळी कोलाड परिसरातील असंख्य सकल हिंदू समाज उपस्थित होता.

Comments

Popular posts from this blog