ग्रामपंचायत आंबेवाडी आदिशक्ती अभियान समिती अध्यक्षा पदी सौ.प्रितम ताई पाटील यांची निवड
कोलाड (विश्वास निकम) नुकतीच माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. त्यातच महिला सक्षमीकरण करण्यासाठी राज्य सरकारने आदिशक्ती अभियान ही योजना ग्राम पंचायत स्तरावर सुरू केली आहे. या अभियाना अंतर्गत महिला विकास विषयक कार्ये म्हणजेच बालविवाह रोखणे, हुंडा पद्धती बंद करणे,महिला संरक्षण, गावातील एकल महिला, विधवा, परित्यक्ता व निराधार महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच, महिला सक्षमीकरण विषयक कार्ये अंतर्गत महिला बचत गटांची निर्मिती व सक्षमीकरणासाठी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मदतीने कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याचे कार्य करण्यात येणार आहे.या अनुषंगाने आंबेवाडी ग्रामपंचायतीने आदिशक्ती अभियान समिती स्थापन केले असुन या समितीच्या अध्यक्ष पदी सौ.प्रितमताई निशिकांत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या जाणीव जागृती कार्यक्रमांतर्गत कायदे, योजना व त्यांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा व सुविधा याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणे अंतर्गत आरोग्य, शिक्षण व संरक्षणाशी संबंधित असणाऱ्या समित्यांना बाल संरक्षण समिती, महिला आरोग्य व पोषण समिती, महात्मा गांधी तंटा मुक्त ग्राम समित्ती शालेय व्यवस्थापन संदर्भात काम करण्यात येईल. सामाजिक सुरक्षितते करीता कार्यक्रम अंतर्गत अंध, अपंग, विकलांग यांना शासनाच्या योजनांमध्ये प्राधान्य देऊन योजना लागू करण्यात येईल. आरोग्य विषयक कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविका / आरोग्य सेविका समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) यांच्या मदतीने गाव पातळीवर आरोग्य तपासणी करण्यात येईल.शिक्षण विषयक कार्यक्रमात किशोरवयीन मुली नियमितपणे शाळेत जातील व त्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडणार नाही याची दक्षता समिती घेईल.
म्हणून ग्राम पंचायत आंबेवाडी येथे माजी सरपंच सुरेश महाबळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम सभा घेऊन आदिशक्ती अभियान समिती अध्यक्षा पदी सौ.प्रीतम ताई निशिकांत पाटील यांची निवड करण्यात आली, तर सचिव पदी सौ.प्रणाली सानप यांची निवड करण्यात आली.तसेच कमिटी सदस्य श्रीकांत चव्हाण, कुमार लोखंडे,दिलीप पाबरेकर, ऋतूजा साळुंखे, प्रिया लोखंडे, तसेच या निवडी बद्दल प्रितम ताई पाटील यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच युवा नेते राकेश शिंदे, सरपंच सुरेश महाबळे, गणेश वाचकवडे,अविनाश पलंगे,आंबेवाडी ग्रामपंचायतील सर्व ग्रामस्थ,अंगणवाडी सेविका यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment