विजेचा शॉक लागून मुलाचा दुर्दैवी मृत्यू!
जिंदाल कॉलनी सुकेळी येथील नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील घटना!
सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली घटनास्थळी धाव!
कोलाड (विश्वास निकम) रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गत असणार्याहून नागोठणे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्येअसणाऱ्या सुकेळी येथील जिंदाल हॉस्पिटल जवळ असणाऱ्या कॉलनीच्या आवारात खेळत असलेल्या मुलाला विजेचा खांबाचा शॉक लागून मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक ११ जून रोजी सायंकाळी ५.०० वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेत मानव कुमार मुकेश पवार वय वर्षे १३ रा. जिंदाल हॉस्पिटल कॉलनी सुकेली, मूळ गाव फतेहपूर ( राजस्थान) याचा मृत्यू झाला असुन या घटनेमुळे सुकेली परिसरात शोककळा पसरली आहे.
![]() |
याच विजेच्या खांबाचा शॉक लागून दुर्दैवी 13वर्षीय मुलाचा अंत झाला. हे दाखविताना सामाजिक कार्यकर्ते दिनेश कातकरी व सतीश सुटे, |
प्राप्त झालेल्या माहिती नुसार मानव कुमार हा १३ वर्षाचा मुलगा जिंदाल हॉस्पिटल कॉलनीच्या बाहेर असलेल्या मैदानात कॉलनीतील इतर मुलांच्या सोबत खेळत होता.खेळताना त्यांचा चेंडू कंपाउंड बाहेर गेला असता तो आणण्यासाठी मानव कुमार कंपाउंडच्या जालीवर चढला असता त्याचा लगत असलेल्या विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने त्याला मोठा शॉक लागला. त्वरित त्याला रोहा येथील डॉ.जाधव नर्सिंग होम येथे हलविण्यात आला. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले असुन या घटनेबद्दल स्थानिक नागरिक मनोहर भाई सुटे, दिनेश कातकरी,सतिश सुटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.अधिक तपास नागोठणे पोलिस करीत आहेत.
Comments
Post a Comment