रोहा तालुक्यातील घटना!
मुंबई गोवा महामार्गावर फॉर्च्युनर कारची एसटी बसला जोरदार धडक, दोनजण जखमी,खांब गावानजिक घडला अपघात
कोलाड (विश्वास निकम) मुंबई गोवा महामार्गावर खांब नजीक रविवारी १ जून रोजी फॉर्च्यूनर कार वरील चालकाचा ताबा सुटल्याने समोरील एसटी बसवर कार धडकल्याने दुर्दैवी अपघात घडल्याची घटना घडली असून यात कारमधील चालक व त्याची पत्नी हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून फॉर्च्युनर कार व एसटी बसचा देखील मोठ्या प्राणावर नुकसान झाले आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गवर रविवारी सायंकाळी साडेपाच च्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती कोलाड पोलिसांनी दिली आहे तर एसटी बस क्रमांक एम एच ०८ ए पी ५८२५ वरील चालक संतोष काशीराम बुधकर वय वर्षे (४०) हे ही बस प्रवासी घेऊन मुंबई च्या दिशेने कोलाड महाड दिशेकडे येत होते तर संतोष मेढेकर हे आपल्या ताब्यातील फॉर्च्युनर कार क्रमांक एम एच ०६ बी यू ९९३६ हे विरुद्ध दिशेने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मुंबई कडे जात असतांना कारवरील ताबा सुटल्याने समोरील एसटी बसवर धडकल्याने संतोष मेढेकर व त्यांच्या पत्नी कविता मेढेकर गंभीर जखमीं झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिस व सहयाद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेची टीम घटनास्थळी दाखल होऊन कार मधील जखमीना बाहेर काढले व पुढील उपचारासाठी जिंदाल हॉस्पिटल सुकेली येथे पाठविण्यात आले असून अधिक तपास कोलाड पोलिस सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नागे करीत आहेत.
Comments
Post a Comment