द.ग.तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक कोलाडचा एस.एस.सी निकाल १०० टक्के,कु.वेदिका कापसे ९३.८० टक्के गुण मिळवून प्रथम 

  कोलाड (विश्वास निकम )मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत परीक्षेचा निकाल मंगळवार दि.१३ मे २०२५ रोजी दु. १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला.या परीक्षेत  रोहा तालुक्यातील सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे द. ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलाड या विद्यालयाचा निकाल १००%लागला असुन या विद्यालयात कु. वेदिका अजय कापसे हिने ९३.८०%गुण संपदीत करून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

  द. ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक कोलाड यांनी यशाची उज्वल परंपरा  कायम ठेवलेले असुन या विद्यालयातील एकूण ११९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.हे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन या विद्यालयाचा एस.एस.सी.चा निकाल १००% लागला आहे.

 या विद्यालयात कु. वेदिका अजय कापसे ९३.८०%गुण संपादान करून प्रथम,कु.वर्णीत किशोर मालुसरे ९३%गुण संपादन करून द्वितीय,कु. अदिती योगेश पानसरे ९२.४०%गुण संपादन करून तृतीय,कु. श्रेया उमेश बिरगावले ९२.२०%गुण संपादन करून चतुर्थ, तर कु. सिद्धी संतोष निकम ८९.८०% गुण संपादन करून पाचवे क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहेत.

 या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्यध्यापक तिरमिले सर, सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog